देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसला आमचे विचार चालतात पण आम्ही चालत नाही. त्यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी नाही अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी आपली खंत बोलून दाखवली. ...
नरेंद्र मोदी ड्रामा किंग असून न्याय योजनेची खिल्ली म्हणजे गरिबांची खिल्ली पंतप्रधानांनी उडवल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. ...
राजकीय फायद्यासाठी चौकीदार या शब्दाचा वापर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी करत असल्याची तक्रार पंजाबमधील लाल झेंडा पेंडू चौकीदार युनियनने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...
प्रियंका यांच्या छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सभांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्टार प्रचारकांमध्ये प्रियंका गांधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ...
दिलीप गांधी यांची नाराजी दूर करण्यासाठी विखे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली. केवळ पुत्रप्रेमापोटी विखे-पाटलांनी गांधी यांची समजूत काढण्यासाठीच भेट घेतल्याचे बोलले जात आहे. ...
इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या सहानुभूतीने काँग्रेस पक्षाला आठव्या लोकसभेत प्रचंड बहुमत मिळाले होते. राजीव गांधी यांच्या रूपाने चाळीस वर्षांचे तरुण-तडफदार पंतप्रधान देशाला लाभले होते. ...
उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाला यूपीए सरकारच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. ...