देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
२०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थ ...
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या ११ उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे २ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार भाजपाचे उमेदवार अॅड. संजय धोत्रे यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक आहे. ...
एखाद्या राजकीय पक्षाची स्वत: ची वृत्तवाहिनी असावी का, तेही आचारसंहिता लागू असताना, असा सवाल आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाला केला होता. तसेच असं करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ...