lok sabha congress press conferencee on arunachal cm pema khandu | पेमा खांडू यांच्या ताफ्यातून 1.80 कोटी रुपये जप्त, काँग्रेसचा आरोप 
पेमा खांडू यांच्या ताफ्यातून 1.80 कोटी रुपये जप्त, काँग्रेसचा आरोप 

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बुधवारी नवी दिल्लीत काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील एका कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगितले.

रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आले, यासंबंधीचा व्हिडीओ दाखविला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत चौकीदाराची चोरी पकडण्यात आली, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. 


याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेशात प्रचारसभा आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचा वापर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठी करण्यात येणार होता, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांच्याकडून करण्यात आला आहे. 


Web Title: lok sabha congress press conferencee on arunachal cm pema khandu
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.