देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राष्टÑवादीच्या प्रचारासाठी नाशिक तालुक्यातील सिध्दप्रिंपी येथे शरद पवार यांची आज सभा असून याठिकाणी व्यासपीठावर असलेल्या छायाचित्रांमधून विखे पाटील यांचे छायाचित्र गायब करण्यात आले आहे. ...
पाच वर्षे राज्यात तसेच केंद्रात विरोधकांची सत्ता होती़ आमदार भाजपचा, सरकार भाजपचे तरीही मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प ‘जैसे थे’ आहे़ हे धरण माझ्यासाठी जिव्हाळ्याचे आहे़ कै़शंकरराव चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या या धरणाचे काम मीच पूर्ण करणार असा शब् ...
पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. ...