देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ...
ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. ...
पवारांनी आणि त्यांच्या टीमने पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांना धुळ चारली. हाच पॅटर्न फुटणाऱ्या आमदारांवर देखील वापरण्यात येईल, असंही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून शासनाने कुठलेही नियोजन केले नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेवून काँग्रेसच ...
सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत ...