"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:20 IST2026-04-14T15:18:31+5:302026-04-14T15:20:08+5:30

नोएडामध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर मंगळवारीही कामगारांचं आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन आता एक कट असल्याचं समोर येत आहे. आंदोलकांना ...

noida protest viral audio and instagram chat appeal to violent mobs bringing chili powder and lathi charging police | "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल

"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल

नोएडामध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर मंगळवारीही कामगारांचं आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन आता एक कट असल्याचं समोर येत आहे. आंदोलकांना जाणीवपूर्वक भडकवलं जात आहे जेणेकरून ते मोठ्या संख्येने एकत्र येतील. या निदर्शनांसाठी व्हॉट्सएप आणि इन्स्टाग्रामवर खास ग्रुप बनवण्यात आले होते, ज्याद्वारे लोकांना चिथावणी दिली जात होती. आता काही चॅट्स आणि ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत, ज्यामध्ये एक व्यक्ती ग्रुपमधील सदस्यांना सांगत आहे की, मंगळवारी पुन्हा पोलिसांवर हल्ला करायचा आहे.

ऑडिओमध्ये ती व्यक्ती म्हणतेय, "पोलिसांवर पुन्हा लाठीचार्ज झाला पाहिजे. आपले अनेक भाऊ-बहीण जखमी झाले आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी सकाळी लवकर येण्याची कृपा करावी." मिळालेल्या माहितीनुसार, ही ऑडिओ क्लिप सोमवार रात्री ग्रुपमध्ये फिरवण्यात आली होती. पोलिसांविरुद्ध हिंसा करण्यासाठी ही व्यक्ती लोकांना प्रवृत्त करत आहे. याचसोबत इन्स्टाग्रामवरील चॅटही समोर आले आहे, ज्यामध्ये सर्वांना सोबत 'मिरचीपूड' आणण्यास सांगितलं जात आहे.

"फक्त मिरचीपूड सोबत ठेवा"

राहुल सिंह नावाच्या एका व्यक्तीने चॅटमध्ये लिहिलं आहे की, "भावांनो, जर लाठी उगारली गेली तर काही विचार करू नका, फक्त मिरचीपूड सोबत ठेवा, विषय संपला. सर्व भाऊ-बहिणींना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात मिरचीपूड घेऊन या." तर दुसरीकडे, एक व्यक्ती म्हणत आहे की, जोपर्यंत आमची मागणी ऐकली जात नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील.

जमावाला एकत्र येण्याचं आवाहन

पोलीस आता या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करत आहेत. ऑडिओमध्ये एक व्यक्ती लाठीचार्जनंतर पुन्हा जमावाला एकत्र येण्याचं आवाहन करताना स्पष्टपणे ऐकू येत आहे. नोएडाच्या फेज-२, सेक्टर-६०, ६२ आणि ८४ सह अनेक औद्योगिक क्षेत्रांमध्ये पगारवाढीच्या मागणीसाठी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं होतं. याच दरम्यान दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. अनेक वाहनं पेटवून देण्यात आली आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Web Title : नोएडा अशांति: मिर्च स्प्रे के इस्तेमाल को उकसाने वाले ऑडियो, चैट वायरल।

Web Summary : नोएडा हिंसा के बाद, श्रमिकों को फिर से दंगा करने के लिए उकसाने वाले ऑडियो और चैट प्रसारित हो रहे हैं। उनसे पुलिस के खिलाफ इस्तेमाल के लिए मिर्च स्प्रे लाने का आग्रह किया गया है। विरोध वेतन मांगों से उपजा और हिंसक हो गया।

Web Title : Noida unrest: Provocative audio, chat urging pepper spray use goes viral.

Web Summary : After Noida violence, audio and chats inciting workers to riot again are circulating. They are urged to bring pepper spray for use against police. Protests stemmed from wage demands and turned violent.