मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 18:32 IST2026-04-14T18:29:15+5:302026-04-14T18:32:09+5:30
जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, "मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा विचार करून आपल्या सरकारने इस्रायलसोबतच्या संरक्षण करारांचे 'ऑटोमॅटिक रिन्यूअल' रोखण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या करारांबाबतचा अधिक तपशील त्यांनी सार्वजनिक केला नाही. या निर्णयासोबतच त्यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (होर्मुज सामुद्रधुनी) पुन्हा सुरू करण्यावरही विशेष जोर दिला.

मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
मध्य पूर्व आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इटलीनेइस्रायलसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इस्रायलसोबतचे सर्व संरक्षण करार स्थगित केले आहेत. विद्यमान परिस्थितीचा हवाला देत त्यांनी हे पाऊल उचलले. तसेच, अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चा पुढे नेणे आवश्यक असल्यावरही त्यांनी जोर दिला.
जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, "मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा विचार करून आपल्या सरकारने इस्रायलसोबतच्या संरक्षण करारांचे 'ऑटोमॅटिक रिन्यूअल' रोखण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या करारांबाबतचा अधिक तपशील त्यांनी सार्वजनिक केला नाही. या निर्णयासोबतच त्यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (होर्मुज सामुद्रधुनी) पुन्हा सुरू करण्यावरही विशेष जोर दिला.
उत्तर इटलीतील वेरोना शहरात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या, "शांतता चर्चेसाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिस्थिती स्थिर करण्यासाठी आणि होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत. हा मार्ग केवळ इंधन पुरवठ्यासाठीच नाही, तर खतांच्या आयातीसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे."
'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा -
अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबादेत झालेली पहिल्या फेरीतील शांतता चर्चा निष्फळ ठरली. आता दुसऱ्या फेरीत काय होते? हे बघण्यासारखे असेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने करारासंदर्भात पुन्हा उत्सुकता दर्शवली आहे. त्यांनी अमेरिकेला तसा संदेशही पाठवला आहे. तर, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनीही इस्लामाबाद चर्चेत काही प्रमाणात प्रगती झाल्याचे म्हटले आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी अंतर्गत तयारी करत आहेत. पुढील आठवड्यात सीझफायरची मुदत संपण्यापूर्वी ही बैठक पार पडू शकते. यासाठी जिनेव्हा आणि इस्लामाबाद ही दोन ठिकाणे चर्चेत असून १६ एप्रिल ही संभाव्य तारीख असू शकते. या प्रक्रियेत तुर्की देखील दोन्ही देशांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.