"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:33 IST2026-04-14T17:32:33+5:302026-04-14T17:33:12+5:30

"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत. मी त्यांच्या डोळ्यात पाहतो, पण ते खाली बघतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Narendra Modi can not make eye contact with me, he only says Yes Sir' in front of Trump says Rahul Gandhi | "नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा

"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. "नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत. मी त्यांच्या डोळ्यात पाहतो, पण ते खाली बघतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'देशद्रोही' असे संबोधले. ते पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका प्रचारसभेत बोलत होते. 

यावेळी राहुल गांधी यांनी, "अमेरिकेसोबत झालेला नवा व्यापार करार हा देशातील लघु आणि मध्यम उद्योगांचे मोठे नुकसान करणारा आहे. यामुले रोजगाराचे प्रचंड संकट निर्माण होईल. तसेच 'SIR' (State Identity Register) मधून मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे हटवणे असंवैधानिक असून काँग्रेसचे सरकार आल्यास ही नावे पुन्हा जोडली जातील, असे आश्वासन दिले.

"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत -
राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत. मी त्यांच्या डोळ्यात पाहतो, पण ते खाली बघतात. ५६ इंचाच्या छातीचा दावा हा केवळ विनोद असून त्यांनी तर देशच विकला आहे." दरम्यान त्यांनी भाजप आणि अदानी यांच्यातील संबंधांवरूनही सरकारवर हल्ला चढवला. "सरकार सर्व कंत्राटे अदानींनाच देते, कारण अदानी सरकारला पैसा आणि पाठबळ देतात. माध्यमही चालवतात. खरे तर, अदानी यांच्या कंपनीचे नाव 'मोदानी' असायला हवे," असे ते म्हणाले. तसेच, अमेरिकेला या व्यवहारांची कल्पना असून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे करिअर संपवण्याची भाषा केली तरी पंतप्रधान शांत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

"ट्रम्प यांना यस सर-यस सर करतात मोद - 
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदींवर ट्रम्प यांचे पूर्ण नियंत्रण आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसाठी कृषी क्षेत्र खुले केले आहे. त्यांनी अमेरिकेसोबत तेल खरेदीचा करार केला आहे. त्यांना सांगण्यात आले आहे की, इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करायचे असेल, तर आधी त्यांना विचारले जाईल." एवढेच नाही तर, नरेंद्र मोदी ट्रम्प यांना केवळ ‘यस सर, यस सर’ म्हणतात. तसेच, ट्रम्प यांच्यासोबत करार  करण्यात आला आहे की, भारत अमेरिकेकडून दरवर्षी ९ लाख कोटी रुपयांचा माल खरेदी करेल. राहुल गांधी म्हणाले की, या व्यापार कराराचे स्वरूप स्पष्टपणे दाखवते की पंतप्रधान मोदी देशद्रोही आहेत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

Web Title : मोदी आँखें नहीं मिलाते, ट्रम्प के आगे झुकते हैं: राहुल गांधी का हमला

Web Summary : राहुल गांधी ने मोदी पर 'देशद्रोही' होने का आरोप लगाया, कहा कि वे आँखें नहीं मिलाते और ट्रम्प के प्रभाव में भारतीय व्यवसायों के बजाय अमेरिकी हितों को प्राथमिकता देते हैं। उन्होंने दावा किया कि मोदी के सौदे भारत की कीमत पर अमेरिकी व्यापार का समर्थन करते हैं।

Web Title : Modi avoids eye contact, obeys Trump: Rahul Gandhi's scathing attack.

Web Summary : Rahul Gandhi accuses Modi of being a 'traitor,' alleging he avoids eye contact and prioritizes US interests over Indian businesses, especially with Trump's influence. He claims Modi's deals favor American trade at India's expense.