देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिल ...
शून्यावरून चार आमदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. शिवाय पाच जागा लढवून त्यांतील चार जिंकल्या आहेत. या जागा निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ...