पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:41 IST2026-04-18T11:23:11+5:302026-04-18T11:41:02+5:30

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने एका महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघड

BJP Legal Wing State Official Arrested in Pune Along with Wife and Daughter Over Secretary Murder | पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह

पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह

Pune Crime: पुणे शहर अंगावर काटा आणणाऱ्या एका हत्याकांडाने हादरले आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने, एका वकिलाच्या पत्नीने आपल्या १३ वर्षीय मुलीच्या मदतीने त्याच्या महिला सेक्रेटरीचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. चंदननगर परिसरातील जुन्या मुंढवा रोडवर असलेल्या वकिलाच्या कार्यालयातच हा रक्ताचा खेळ खेळला गेला. याप्रकरणी पोलिसांनी वकील, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

पूनम दिनेश मून (वय ३२, रा. येरवडा) या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या कार्यालयात साहाय्यक (सेक्रेटरी) म्हणून काम पाहत होत्या. १६ एप्रिल रोजी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. मात्र, ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती सावंत हिला पूनम आणि आपल्या पतीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच रागातून स्वाती आणि त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीने पूनम यांचे हात-पाय बांधले आणि बॅटने त्यांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार करून त्यांची हत्या केली.

गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत पूनम घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश यांनी वकिलाला फोन केला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेली असेल, असे सांगून वकिलाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुक्रवारी सकाळी जेव्हा दिनेश स्वतः कार्यालयात पोहोचले, तेव्हा शटर उघडे असल्याचे दिसले. आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रक्ताच्या थारोळ्यात पूनम यांचा मृतदेह पडला होता आणि तो एका पोत्यात भरून लपवण्याचा प्रयत्न केला गेला होता.
या हत्याकांडात वकिलाची प्रत्यक्ष भूमिका नसली, तरी आपल्या डोळ्यासमोर घडलेला गुन्हा लपवणे आणि आरोपींना मदत करणे यामुळे ॲड. संजय सावंत यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वकिलाने ही संपूर्ण घटना माहित असूनही पोलिसांपासून लपवून ठेवली आणि पूनमच्या पतीला खोटी माहिती दिली.

पोलिसांची झडती आणि अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या ६ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.

राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ

ॲड. संजय सावंत हे भाजपच्या विधी शाखेचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी असल्याने या प्रकरणाची चर्चा संपूर्ण पुण्यात सुरु आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे में सनसनी: भाजपा नेता की पत्नी ने सेक्रेटरी की हत्या की

Web Summary : पुणे में भाजपा नेता की पत्नी ने अवैध संबंध के शक में अपनी बेटी के साथ मिलकर पति की सेक्रेटरी की निर्मम हत्या कर दी। शव को बोरे में छुपाया। तीनों गिरफ्तार।

Web Title : Pune Shaken: BJP Leader's Wife Murders Secretary, Hides Body

Web Summary : Pune reels as a BJP leader's wife, suspecting an affair, brutally murdered her husband's secretary with her daughter's help. The body was hidden in a sack. All three are arrested.