नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:56 IST2026-04-18T10:54:19+5:302026-04-18T10:56:38+5:30

आम्ही कंपनीत नोकरी करीत होतो, आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असून आमच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे या दोघांनी सांगितले.

ATS now enters Nashik TCS case; Is Nida Khan related to Delhi bomb blast accused? | नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?

नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?

नाशिक - टीसीएस कंपनीतील अत्याचार प्रकरणात शुक्रवारी प्रथमच दहशतवादी विरोधी पथकाची (ATS) एन्ट्री झाली. अटकेतील रजा रफिक मेनन (३५) तसेच शफी भिकन शेख (३६) यांची विभागीय एटीएस शाखेने तीन तास कसून चौकशी केली. एचआर मॅनेजर निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील एका आरोपीशी संबंध असल्याच्या संशयाने या दोघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 

प्राप्त माहितीनुसार हे दोघेही एकेकाळी निदा खानचे विश्वासू सहकारी होते. देशाच्या सुरक्षेशी संबंधित काही प्रश्न दोघांना एटीएसने विचारल्याचे समजते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणांनी लक्ष घातले असून दिल्लीतील एटीएस टीमने एसआयटीकडून काही माहिती घेतली होती. त्यानंतर काही बाबींचा संशय गडद झाल्याने स्थानिक एटीएसला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. शफी तसेच रजा यांना तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने अटक केली होती. शनिवारी या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येईल, परंतु, त्यापूर्वीच त्यांची चौकशी एटीएसने केल्याने चौकशीतून या दोघांचे तसेच निदा खानचे कनेक्शन तपासण्यात आले. शुक्रवारी पाच वाजता या दोघांचा ताबा एसआयटीकडून एटीएसने घेतला. एटीएसच्या कार्यालयात दोघांना आणण्यात आले. आम्ही कंपनीत नोकरी करीत होतो, आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असून आमच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे या दोघांनी सांगितले. चौकशीनंतर पुन्हा त्यांचा ताबा एसआयटीने घेतला. चौकशीची माहिती सूत्रांनी दिली.

दोघांना विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

आंतरराष्ट्रीय टोळीशी काही संबंध आहे का?
निदा खानची ओळख कधीपासून होती.
आंतरराष्ट्रीय कॉल होत होते का?
बाहेरुन काही फंडिंग वैगेरे
घरी कोण कोण असते, कमवते व्यक्ती किती
कंपनीत धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता का?

चॅटिंगमधून धक्कादायक बाबी उघड
 
दरम्यान, टीसीएस प्रकरणात डिजिटल व तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरणार असून अनेक पुराव्यांचे क्लोनिंग करण्यात आल्याने त्याच्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा करण्यात एसआयटीला यश आले आहे. आठही आरोपींचे मोबाइल, त्यांचे लॅपटॉप पथकाने जप्त केले होते. ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चेनानी हिला आरोर्पीचे आलेले एकूण ७८ मेल, २२ फोन कॉल फॉरेन्सिक टीमने तपासले. फरार निदा खान हिने आरोपींना केलेले चॅटिंगही तपासण्यात आले आहे. अटकेतील आरोपी व निदा खान यांच्यातील ऑफिस कामाव्यक्तिरिकत असलेले चॅटिंग संशयास्पद वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडितांना फसवून धर्मांतराचा डाव रचण्यासाठी जो व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता त्याच्यातील बारकावेदेखील डिजिटल तपासणीतून करण्यात आली. एका रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजही एसआयटी पथकाने ताब्यात घेतले. ९ गुन्हे दाखल झाल्यानंतर पीडितांचा जबाब घेण्यात आला. प्रत्यक्ष पुरावा हाती हवा यासाठी डिजिटल व तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पथकाने परिश्रम घेतले. 

Web Title : नाशिक टीसीएस मामले में एटीएस की एंट्री; क्या निदा खान का बम धमाकों से संबंध?

Web Summary : एटीएस ने नाशिक टीसीएस उत्पीड़न मामले की जांच की, रजा मेनन और शफी शेख से पूछताछ। एचआर मैनेजर निदा खान के दिल्ली बम धमाकों के एक संदिग्ध से संबंध होने का संदेह। डिजिटल सबूत और व्हाट्सएप चैट से संदिग्ध गतिविधियां और धर्मांतरण के प्रयास सामने आए।

Web Title : ATS enters Nashik TCS case; Nida Khan linked to bombing?

Web Summary : ATS investigates Nashik TCS abuse case, questioning Raza Menon, Shafi Sheikh. Suspicions arise about HR manager Nida Khan's connection to a Delhi bombing suspect. Digital evidence and WhatsApp chats reveal suspicious activity and conversion attempts.