Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:54 IST2026-04-18T12:52:52+5:302026-04-18T12:54:15+5:30

Nagpur Youths Vandalise Bar: नागपूरच्या मानेवाडा चौकातील एका बारमध्ये दारू देण्यास नकार दिल्याने तरुणांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

Furniture vandalized, employees beaten, bottles thrown at manager; Youths riot in bar | Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा

Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा

उपराजधानीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकातील एका बारमध्ये दारू देण्यास नकार दिल्याने तरुणांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात बारच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले असून, घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना १६ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बार बंद करण्याची वेळ झाल्याने कर्मचाऱ्यांनी दारू देण्यास नकार दिला. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या तरुणांनी थेट बारमध्ये घुसून तोडफोड सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बार व्यवस्थापक आणि कर्मचारी रात्रीची आवराआवर करत असताना काही तरुण बारमध्ये शिरले आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बारचा व्यवस्थापक काउंटरच्या मागे लपला, मात्र हल्लेखोरांनी तिथेही पाठलाग सोडला नाही. एका तरुणाने काउंटरवर चढून दारूच्या  बाटल्या थेट व्यवस्थापकाच्या दिशेने भिरकावल्या.

एका मिनिटापेक्षाही कमी वेळात तरुणांनी सुमारे १८ दारूच्या बाटल्या फोडल्या. इतर कर्मचाऱ्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात व्यवस्थापक पूर्णपणे रक्तबंबाळ झाला. व्हिडिओच्या शेवटी एक तरुण कर्मचाऱ्याच्या डोक्यात बाटली फोडतानाही दिसत आहे. काही वेळ धुमाकूळ घातल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. 

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाढत्या गुन्हेगारीवर संताप व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे वाद आणि तरुणांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असला, तरी या प्रकरणी अद्याप किती जणांवर कारवाई झाली किंवा कोणाला अटक करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस सध्या या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असल्याची शक्यता आहे.

Web Title : नागपुर बार में मारपीट: शराब से इनकार पर फर्नीचर तोड़ा, कर्मचारियों पर हमला

Web Summary : नागपुर में, बार बंद होने के समय शराब परोसने से इनकार करने पर हिंसक मारपीट हुई। युवाओं ने फर्नीचर तोड़ा, कर्मचारियों पर हमला किया और बोतलों से प्रबंधक को घायल कर दिया। सीसीटीवी फुटेज की जांच जारी है।

Web Title : Nagpur Bar Brawl: Furniture Vandalized, Staff Assaulted Over Alcohol Refusal

Web Summary : In Nagpur, refusal to serve alcohol at closing led to a violent bar brawl. Youths vandalized furniture, assaulted staff, and injured the manager with bottles. CCTV footage is under investigation.