Maharashtra Government : Meeting of Shiv Sena-Congress-NCP leaders begins | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?; चर्चा सकारात्मक, उद्याही होणार - पृथ्वीराज चव्हाण
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?; चर्चा सकारात्मक, उद्याही होणार - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकासआघाडी असे नवे सरकार राज्यात स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात खलबतं सुरू आहे. 

मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची 'महा'बैठक सुरू झाली. या बैठकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाल्याचे सांगण्यात येते.

बैठकीतील लाइव्ह अपडेट्स...

- तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर सहमती, अनेक विषयांवर सहमती बाकी आहेत. उद्या सर्व विषयांवर सहमती झाली की संपूर्ण माहिती देऊ - प्रफुल्ल पटेल

- आज तिन्ही पक्षाची बैठक झाली. यावेळी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. आज सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झाली. उद्याही पुन्हा चर्चा होणार - पृथ्वीराज चव्हाण


- मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली असल्याचे शरद पवार यांनी बैठकीनंतर सांगितले. मात्र पहिल्यांदाच आमच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एकत्र चर्चा झाली. बऱ्याच गोष्टीवर आम्ही मार्ग काढला असल्याचे सांगत शरद पवारांच्या विधानावर बोलणं टाळले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मला तुम्हाला अर्धवट माहिती सांगायची नाही. सर्व प्रश्न सोडवून तुमच्यासमोर येऊ असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.


- मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती झाली आहे - शरद पवार 

-उद्धव ठाकरेंनी सरकारचं नेतृत्व करावं यावर आम्ही सर्व सहमत आहोत, सरकार कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे चालेल, याबाबत चर्चा झालेली  नाही, ती उद्या होईल- शरद पवार

- उद्या पत्रकार परिषद होईल.अजून दोन ते तीन तास बैठक चालेल महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे- शरद पवार 


- शरद पवार बैठकीतून बाहेर

- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची बैठक अद्याप सुरूच

- विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा

- दीड तासांपासून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

- बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाला शरद पवारांचे प्राधान्य असल्याचे समजते

- सत्तास्थापनेचा दावा उद्याच करावा, महाबैठकीत नेत्यांचा सूर

- गेल्या 40 मिनिटांपासून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू

- सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे उद्या की परवा करायचा याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत ठरणार

- आजच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद, सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे बैठकीसाठी नेहरु सेंटरमध्ये पोहोचले


- आदित्य ठाकरे, मिलींद नार्वेकर सुद्धा बैठकीला उपस्थित

- शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकीला सुरुवात

- नेहरू सायन्स सेंटरमध्ये शरद पवार आणि संजय राऊत पोहोचले

Web Title: Maharashtra Government : Meeting of Shiv Sena-Congress-NCP leaders begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.