देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शिवसेनेच्या या दाव्यानंतर भाजपा सरकार पाडण्यासाठी कोणत्याही आघाडीसाठी आम्ही प्रयत्नशील नसल्याचे म्हणत काँग्रेसने संजय राऊत यांचा दावा खोडून काढला होता. ...
भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर पटोले यांनी अनेकदा टीका केली आहे. आता विधानसभेत भाजप आणि पटोले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे. ...