राज्यातील सत्तास्थापनेनंतर पुणे महापालिकेत काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या आशा पल्लवीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 07:21 PM2019-11-30T19:21:11+5:302019-11-30T19:24:20+5:30

सत्ता स्थापनेनंतर पुण्यात राजकीय चढ उतार

Hope for Congress-Nationalist and shivsena in pune corporation | राज्यातील सत्तास्थापनेनंतर पुणे महापालिकेत काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या आशा पल्लवीत

राज्यातील सत्तास्थापनेनंतर पुणे महापालिकेत काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या आशा पल्लवीत

Next

पुणे: राज्यातील सत्तास्थापनेनंतर त्यात सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सत्तेतून काही पदलाभ होण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
विधानसभेच्या शहरातील सर्वच म्हणजे ८ जागा भाजपाकडे होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यातील दोन जागा खेचून आणल्या, त्यामुळे त्या दोघांपैकी किमान एकाला तरी विस्तारीत मंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान द्यावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यातही चेतन तुपे यांनी महापालिकेत व नंतर शहराध्यक्षही म्हणून चांगली कामगिरी केल्यामुळे, शहरात पक्षाला बळ मिळावे यासाठी त्यांना ही संधी द्यावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 
काँग्रेसनेही विधानसभेच्या तीन जागा लढवल्या होत्या. त्यातील कॅन्टोन्मेट व शिवाजीनगर या जागांवर त्यांनी चांगली लढत दिली. पक्षाकडून थोडी शक्ती मिळाली असती तर या दोन जागा जिंकता आल्या असत्या. आता तिथे पुढील निवडणूकीत तरी यश मिळावे यासाठी आत्तापासूनच पक्षाने तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पदांच्या माध्यमातून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या दुसºया फळीतून होत आहे. सरकारी समिती किंवा महामंडळ यावर नियुक्ती मिळावी म्हणून या परिसरातील काहींनी मोर्चेबांधणीही सुरू केली असल्याचे दिसते आहे. 
या दोन्ही पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे विधानपरिषदेच्या जागांवरही लक्ष आहे. राष्ट्रवादीकडे ५४ तर काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. त्यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी मिळू शकते. दर दोन वर्षांनी विधानपरिषदेचे सदस्य निवृत्त होतात. काँग्रेसचे अनंत गाडगीळ व शरद रणपिसे असे पुण्यातील दोन सदस्य सध्या विधानपरिषदेत आहेत. त्यांच्या जागेवर संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे पुण्यातील काही ज्येष्ठ प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही आम्हाला आता तरी विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती मिळाली. 

......................................................

Web Title: Hope for Congress-Nationalist and shivsena in pune corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.