देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले; मात्र त्याची पूर्णपणे अंमलबजावणी देशात होत नसल्याचे दिसून येत आहे. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेसचे प्रशिक्षण व संदेश प्रभारी सचिन राव यांनी केल ...
‘गाव तेथे काँग्रेस’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण ३१ मार्चपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामकमिट्या स्थापन करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर द ...