देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी मुंबई काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक आणि २०२२च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा केली. ...
२०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. सध्याच्या परिस्थितीत दहासुद्धा नगरसेवक निवडून येणे कठीण आहे, असे मत काँग्रेसच्या माजी मंत्र्याने व्यक्त केले. ...
चौधरी यांना देशाचे राष्ट्रगीतही म्हणता येत नाही, असा टोला एका काँग्रेस नेत्याने लगावला आहे. विशेष म्हणजे या काँग्रेस नेत्याने यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत, या मंत्री मोहोदयांच्या ज्ञानाचा पार 'पंचनामा' केला आहे. ...
काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुपकर आघाडीमध्ये काँग्रेसचा देखील समावेश असल्याचा खळबळजनक दावा फडणवीस यांनी केला आहे. ...