देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Local Body Election: नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसने केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षां ...
Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर वाद, अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे. ...
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. येथेही भाजप सरकार मत चोरीसारखे प्रकार करू शकतात, असा दावा माणिकराव ठाकरेंनी केला आहे. ...