एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
CoronaVirus News in Marathi and Live Updates : 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसला ७ मे २०२० पासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३१ उड्डाणे करत ६०३७ भारतीयांना मायदेशात परत आणण्यात यश आले, असे नागरी उड्डयन मंत्र ...
एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. वैमानिकांचे फ्लाईट रोस्टर तयार करण्यासाठी उड्डाणाच्या 72 तासांपूर्वी कोविड 19 ची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्या तपासणीमध्ये या पाच जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडियाद्वारे परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना देशात परत आणण्यात येते आहे. ...
‘लॉकडाउनपर्यंत सर्व कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करू नये, अशी सूचना केंद्रीय गृह सचिवांनी २९ मार्च रोजी आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दिली,' असे याचिकेत म्हटले आहे ...
वंदे भारत मिशन अंतर्गत दिल्ली आणि कलकत्ता येथे विदेशातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे मायभूमीत आगमन होणार आहे. सिंगापूर, ढाका आणि रियाद येथून भारतातील या शहरांमध्ये विमानांचे लँडिंग होणार आहे ...