एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. याचा फटका विमानतळावर जाणाऱ्या व्हीआयपींनाही बसला. वाहतूक कोंडीत अडकल्याने १२ प्रवाशांना विमान मिळाले नाही, अशी ...
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेअंतर्गत लवकरच नांदेड - दिल्ली ही एअर इंडीयाची विमानसेवा सुरु होणार आहे. अमृतसर किंवा चंदीगढ मार्गे ही विमानसेवा सुरु होणार असून त्यामुळे सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे़ ...
पायलट उपलब्ध नसल्याने शनिवारी एअर इंडियाचे मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने चालवण्यात आले. परिणामी, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५० प्रवाशांचा खोळंबा झाला होता. ...
मंगळवारी सकाळी महिला प्रवासी आणि एअर इंडियाच्या डयुटी मॅनेजरमध्ये जोरदार वादावादी झाली. उशिरा पोहोचल्याने महिलेला विमानात प्रवेश नाकारण्यात आल्याने या वादाला सुरुवात झाली. ...