झोपताना बेडरूमचा दरवाजा बंद ठेवावा की उघडा? निवांत झोपेवर होतो अनेक गोष्टींचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:11 IST2026-04-16T16:53:58+5:302026-04-16T19:11:21+5:30
Should You Keep Your Bedroom Door Open : अंधार मेलाटोनिन सक्रीय करण्यास मदत करतो. हे हॉर्मोन झोपेसाठी खूप महत्वाचे असते.

बऱ्याच लोकांना अंथरूणात पडल्यानंतर लगेच झोप येत नाही. बरेच लोक दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवून झोपणं पसंत करतात. तर काहीजण बंद खोलीत झोपतात. तर काहीजण अंधारात छोटा बल्ब लावून झोपतात. (Should You Keep Your Bedroom Door Open Or Close While Sleeping)

एक्सपर्ट्सच्यामते झोपण्यासाठी योग्य वातावरण कोणतं असतं. कोणत्या प्रकारच्या खोलीत झोपल्यानं चांगली झोप येते याबाबत सविस्तर समजून घ्यायला हवं.

रात्री झोपताना तुम्ही खोलीचा दरवाजा बंद ठेवता की उघडा याचा थेट परिणाम तुमची झोप, श्वास घेण्याची क्रिया यावर होतो. यावर एक्सपर्ट्स काय म्हणतात समजून घेऊ.

झोपताना दरवाजा बंद ठेवावा की उघडा?
जेव्हा तुम्हाला झोपण्यासाठी चांगलं वातावरण हे असते तेव्हा खोली थंड आणि डार्क असायला हवी. जेव्हा वातावरण थंड असेल तर तेव्हा तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. खोलीचं तापमान जवळपास २० ते २२ डिग्री सेल्सियसवर ठेवायला हवं.

अंधार मेलाटोनिन सक्रीय करण्यास मदत करतो. हे हॉर्मोन झोपेसाठी खूप महत्वाचे असते. जर तुम्ही दरवाजा उघडा ठेवून झोपत असाल तर हॉलमधून रुमध्ये उजेड येऊ शकतो. म्हणून नेहमीच दरवाजा बंद ठेवून झोपा.

दरवाजा बंद ठेवल्यामुळे बेडरूममध्ये आवाजही जास्त येणार नाही. दरवाजा बंद ठेवून झोपल्यास जरा शांतता जाणवते.

जर घरात पाळीव प्राणी असतील तर बेडरूमचा दरवाजा बंदच असावा कारण यामुळे हे पाळीव प्राणी कधीही आत येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या झोपेत बाधा येऊ शकते.

















