आर.माधवनचा खास सल्ला, ४ गोष्टी करा-घरात नांदेल सुख आणि यशाचीही सापडेल वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 16:04 IST2026-04-22T08:46:19+5:302026-04-22T16:04:38+5:30

R Madhvan Advise : घरातील पसारा हा केवळ भौतिक नसून तो तुमच्या मनातील गोंधळाचे प्रतिबिंब असतो.

प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन याने त्याच्या सोशल मीडियावरून जीवनात यश आणि शांतता मिळवण्यासाठी घरातील कोणत्या 4 सवयी काढून टाकल्या पाहिजे याबाबत सांगितले आहे. (If You Want Success And Peace In life Actor R Madhvan Advises Remove 4 Daily Habits From Your Home)

आर. माधवन हा केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या वैचारीक प्रगल्भतेसाठीही ओळखला जातो. अलिकडेच त्यानं एक व्हिडिओ शेअर केला आहे.

जर तुम्हाला जीवनात प्रगती आणि मन:शांती हवी असेल तर घरातून खालील ४ गोष्टी किंवा सवयी हद्दपार केल्या पाहिजेत.

माधवनच्या मते. ज्या घरात सतत भांडणं आणि नकाराकात्मक वाद होत असतात. त्या घराची प्रगती खुंटते. वारंवार होणाऱ्या मतभेदांमुळे घरातील शांतता भंग होते.

दुसरी महत्वाची गोष्टी म्हणजे सतत तक्रार करणं अनेकदा आपण आपल्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रीत करतो. सततच्या तक्रारींमुळे मनात कमतरतेची भावना निर्माण होते.

अनेकांना मोठी स्वप्न बघायला आवडत पण त्यासाठी लागणारी मेहनत करण्याची तयारी नसेत. आळस हा यशाच सर्वात मोठा शत्रू आहे. आळसामुळे प्रगतीचा वेग मंदावतो.

घरातील पसारा हा केवळ भौतिक नसून तो तुमच्या मनातील गोंधळाचे प्रतिबिंब असतो. अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तूंमुळे कामात लक्ष लागत नाही ताण वाढतो.

यश आणि शांतता ही केवळ नशिबानं मिळत नाही तर आपल्या दैनंदिन सवयींमधून निर्माण होते.