आठवड्याचे राशीभविष्य : 21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2021, "या" राशीसाठी आठवडा आहे एकदम भारी, तर काहींसाठी धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 12:45 PM2021-02-22T12:45:32+5:302021-02-22T13:14:41+5:30

Weekly Horoscope 21 February to 27 February 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवडयात आपणास काही नवीन बातमी मिळणार असल्याने त्यासाठी सज्ज व्हा. आनंद साजरा करण्यासाठी तयार राहावे. आपल्या प्रियव्यक्तीशी प्रेमालाप करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. विरोध झुगारून सुद्धा आपण प्रियव्यक्तीसह फिरावयास जाऊन वार्तालाप कराल व त्यामुळे आपल्यात जवळीक निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टाचे फळ मिळेल. आपल्या कामगिरीवर खुश होऊन आपले वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. व्यापारीवर्गास भरघोस फायदा संभवतो. आपल्या प्राप्तीत वाढ होईल, तसेच थकबाकीची रक्कम सुद्धा मिळू शकेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांची प्रकृती चांगली राहील. घरात आनंद पसरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवीन उपकरण मिळेल व त्यामुळे आपल्या उत्साहात वृद्धी होईल. आठवड्यात आरोग्य उत्तम राहील. इतकेच नव्हे तर जुन्या आजारातून सुद्धा सुटका होईल.

आठवड्यात आपण स्वमग्न राहाल. अशी एखादी गोष्ट असेल कि जी इतरांपासून लपवून पुढे जाण्याची गरज असेल. मात्र, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. आपला एखादा चांगला मित्र किंवा नातेवाईकास आपल्या चिंते बद्धल मोकळेपणाने बोलणे हे अशा परिस्थितीत हितावह होईल. मित्रांमुळे आपला फायदा होईल. कामाच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरीत आपले यश वाढेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी वाद घातल्यास आपल्या समस्येत वाढ होईल. वैवाहिक जीवनात परिस्थिती सुधारेल. आठवड्यात प्रेमीजनांना दूरवरच्या प्रवासास जाण्याची संधी मिळेल. एखादा प्रवास आपल्या कामासाठी उपयुक्त ठरेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्या खास लोकांशी संभाव्य दुरावा टाळून आवश्यकता भासल्यास त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस शक्यतो प्रवास टाळावा. तसेच वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे. आपली प्राप्ती इतकी जास्त नाही कि खर्चात झालेली अवाढव्य वाढ आपण पेलू शकाल. अशा वेळी खर्च नियंत्रित ठेवणे हितावह होईल. आपल्या प्रकृतीत थोडी सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागतील. प्रेमीजनांना प्रेमात प्रगती साधण्याची संधी मिळेल. आपल्या प्रियव्यक्तीसह दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची शक्यता अधिक आहे. आठवड्यात कुटुंबियांचे आपणास पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीत चांगले दिवस येतील. नोकरीच्या ठिकाणी आपल्या आशा पल्लवित होतील. व्यापारीवर्गास आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर पडावे लागेल.

हा आठवडा आपल्यासाठी काहीसा त्रासदायी ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच महत्वाच्या विषयांवर आपले लक्ष केंद्रित होऊ शकणार नाही. दरम्यान नातेसंबंधात तणाव किंवा असंतोष निर्माण होऊ शकतो. असे असले तरी जस जसे दिवस जातील तस तशी परिस्थिती निवळू लागेल. आठवड्यात आपणास आर्थिक स्थितीची काळजी घेण्याचा विशेष सल्ला देण्यात येत आहे. आपण जर शेअर्स बाजारात, सट्टा किंवा तत्सम व्यवसायाशी संबंधित असाल तर आपणास विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा साधारणच आहे. दरम्यान अभ्यासात आपले लक्ष लागू शकणार नाही. असे असले तरी आठवडा अखेरीस ते आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील. ह्या दरम्यान आरोग्य विषयक कोणतीही नवीन समस्या निर्माण होणार नाही. इतकेच नव्हे तर जुन्या आजारातून सुद्धा मुक्ती मिळू शकेल.

आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी चांगलीच होईल. आपण कामात व्यस्त राहाल. आपण कुटुंबियांना तसेच नोकरी - व्यवसायास सुद्धा वेळ देऊ शकाल. व्यापारीवर्गास फायदेकारक सौदे झाल्याने कामाचा आनंद घेता येईल. आठवड्याच्या सुरवातीस नोकरी करणाऱ्या जातकांचे एखाद्याशी वाद होण्याची शक्यता असल्याने त्यांना नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात जवळीक वाढली तरी काही कारणाने मतभेद होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रेमीजनांना थोडा धीर धरावा लागेल. आपल्या संततीस एखादा चांगला फायदा संभवतो. अभ्यासात चांगली प्रगती होईल. एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी आपली निवड होऊ शकते. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली मानसिक स्थिती उत्तम राहिल्याने प्रत्येक कामात आपणास यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल, मात्र आपणास वाद टाळावे लागतील. व्यापारी वर्गास हा आठवडा आशादायी आहे. आपली प्राप्ती चांगली झाली तरी पूर्वीपेक्षा खर्चात वाढ झाल्याने आपणास ते जाणवणार नाही. आपले आरोग्य ठिकठिक राहील. पहिल्यापेक्षा त्यात सुधारणा झालेली असेल इतकेच, तेव्हा काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात आनंद पसरून आपल्या प्रेमात वाढ होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीशी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळेल. ह्या दरम्यान आपल्या भावी नात्या संबंधी सुद्धा आपण विचार करू लागाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद लुटता आला तरी काही कारणाने आपल्या अभ्यासावर त्यांचे लक्ष लागू शकणार नाही.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासाचे आयोजन करण्याची शक्यता असून हा प्रवास आपल्यासाठी महत्वाचा असेल. त्यामुळे आपणास सौख्य लाभेल तसेच काही आर्थिक लाभ सुद्धा होतील. आठवड्यात आपली प्राप्ती वाढेल. आपल्या काही योजना फलद्रुप सुद्धा होतील. आपण आपल्या संततीसाठी किंवा त्यांच्या अभ्यासासाठी चांगला खर्च करू शकाल. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल व जोडीदाराच्या माध्यमातून आपणास काही फायदा होईल. प्रेमीजनांच्या नात्यात प्रणयक्रीडा वाढून आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेता येईल. असे असले तरी अधून मधून लटक्या रागास सामोरे जावे लागेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण कार्यरत राहून काही नवीन करण्याचा विचार सुद्धा कराल. व्यापारात मोठा फायदा संभवतो. शासनाकडून सुद्धा लाभ संभवतो. नोकरीत आपले कामावरून लक्ष उडण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक काम करावे.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपण आपल्या व्यापारावर लक्ष द्याल, परंतु दरम्यान कोणताही मोठा सौदा करू नये. त्यासाठी थोडे थांबावे. आठवड्याच्या मध्यास आपल्या कुटुंबियांसह मौज - मजा करण्यात वेळ घालवू शकाल. एकमेकांशी संवाद साधून आपणास बरे वाटेल. आठवड्याच्या अखेरीस आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीचशी कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला असून आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवन मात्र तणावपूर्ण राहील. आपण आपल्या जोडीदाराचा विश्वास संपादन केलात तरच नाते संबंधात गोडवा निर्माण होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीच्या सहवासात चांगला वेळ घालवू शकाल. आपले आरोग्य सामान्यच राहील.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्यात एखादे मोठे काम हाती घेतल्यास ते पूर्णत्वास जाण्याची शक्यता धूसर असल्याने ते घेणे टाळावे. आपणास आपल्या मनातील गोंधळास सामोरे जावे लागेल, ज्यातून बाहेर पडण्यास आपल्याला खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीस खर्चात वाढ होईल, मात्र हळू हळू परिस्थिती आपल्या नियंत्रणात येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. व्यापाऱ्यांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपणास जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. प्रेमीजन आपल्या प्रियव्यक्तीची ओळख आपल्या मित्रांना करून देऊ शकतील. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. ह्या आठवड्यात शक्यतो प्रवास टाळावेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या प्राप्तीत कशी वाढ होईल ह्याकडे आपण लक्ष द्याल. त्यामुळे आपला व्यापार सुद्धा वाढेल व आपल्या क्षेत्रात आपण नांव कमवाल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाचा चांगला लाभ होईल. दरम्यान आपणास एखादे बक्षीस सुद्धा मिळू शकते. आपले सहकारी आपणास अपेक्षित मदत करू शकतील. आपली प्रकृती चांगली राहील. लोकांचे कल्याण करण्यास आपण प्राधान्य द्याल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. आपला समजूतदारपणा व एकमेकांप्रती समर्पण भावना आपले नाते दृढ करेल. आठवड्याच्या सुरवातीस काही गैरसमज होऊन मतभेद होण्याची शक्यता असल्याने प्रेमीजनांनी काळजी घ्यावी. जस जसे दिवस जातील तस तसे दिवस आपणास अनुकूल होतील. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फळे देणारा आहे. आपणास कुटुंबीयांची चिंता सतावेल. कौटुंबिक जीवनाकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या मातेस काही शारीरिक त्रास संभवत असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांना कामाचा आनंद घेता येईल. त्यांचा कामाचे चीज होईल. त्यांची प्रशंसा होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. व्यापारासाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. व्यापार विस्तार होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपणास आपले प्रणयी जीवन खुलविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवाहितांना वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रवास करू शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल व त्यांच्या बरोबर मौज - मजा करण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखाद प्रवास करू शकाल, ज्यात आपणास नवीन काही शिकावयास मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या कामास गती येईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. कामा निमित्त आपणास नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. एखाद्या व्यापारी बैठकीत आपणास सहभागी व्हावे लागेल. विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल. आपण एकमेकांना समजून घेऊ शकाल. कुटुंबियांशी सुद्धा उत्तम सामंजस्य राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच राहील. शिक्षणात चांगली कामगिरी होऊ शकेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आठवड्याच्या अखेरीस प्राप्तीत वाढ होईल.