Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:12 PM2020-05-19T12:12:09+5:302020-05-19T12:36:47+5:30

Lockdown 4.0 : केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट देत यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. देशातील लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. भारतातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनी घोषणा करण्यात आली आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन 4.0 सुरू झालं आहे.

केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट देत यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. देशातील लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. ई-पास असल्यास अडकलेले लोक प्रवास करून आपलं घर गाठू शकतात.

अनेकांना मात्र आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ई-पास हा कुठे आणि कसा मिळतो हे माहीत नाही. मात्र आता काळजी करून नका कारण सरकारने यासाठी एक नवीन वेबसाईट तयार केली आहे

देशभरात प्रवास करता यावा यासाठी असलेला ई-पास काढण्यासाठी आता सरकारने एक नवीन वेबसाईट तयार केली आहे. याच्या मदतीने कोविड ई-परमिटसाठी देशभरातील वेगवेगळ्या राज्यात जाण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर (NIC) ने http://serviceonline.gov.in/epass/ ही नवी वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर 17 राज्यांच्या ई-परमिटसाठी अर्ज करता येणार आहे.

लॉकडाऊन परमिट पाससाठी प्रवासाच्या विशिष्ट श्रेणींमध्येच ऑनलाईन अर्ज करता येतो. विद्यार्थी, आवश्यक सेवा प्रदाता, पर्यटक, यात्रेकरू, आपत्कालीन / वैद्यकीय प्रवास आणि विवाह यांचा या श्रेणींमध्ये समावेश आहे.

एखादी व्यक्ती किंवा गट या सेवेचा वापर करून मूव्हमेंट पाससाठी अर्ज करू शकतात. मात्र यासाठी त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती द्यावी लागणार आहे.

ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन प्रतीदेखील सादर कराव्या लागतील. याशिवाय ओटीपी पडताळणीसाठी एक मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे.

ई-पासमध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, वैधता आणि क्यूआर कोड असतो. पास जारी झाल्यानंतर अर्जदाराकडे प्रवास करताना त्याची सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी असणे आवश्यक आहे.

वेबसाईटवरून अर्ज केल्यानंतर अर्जदारास एक रेफ्रेन्स नंबर मिळेल. अर्जाचं स्टेटस ही यामुळे चेक करता येईल.

ई-पासच्या मदतीने प्रवास करत असताना जेव्हा सुरक्षा कर्मचारी पासबद्दल विचारणा करतील तेव्हा त्यांना तो दाखवणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये ऑटो-टॅक्सीसाठी प्रत्येकी 1 अधिक 1 प्रवासी वाहतूक, कारसाठी 1 अधिक 2 आणि दुचाकीसाठी 1 अधिक 1 (ग्रीन,ऑरेंज) तर रेड झोनमध्ये 1 अशाप्रकारे वाहतूक करण्यात येईल. कंटेनमेंट झोनमध्ये वाहतुकीस परवानगी नाही.

सरकारने शिफारशींमध्ये ऑटो, ई-रिक्षा, सायकल रिक्षा यामध्ये फक्त 1 प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे तर टॅक्सी, कॅबमध्ये 2 प्रवासी वाहतूक करु शकतात. तसेच शेअरींगचा पर्याय उपलब्ध नाही.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार निर्णय घेतील. राज्यात कोणत्या प्रकारे वाहतूक सेवा सुरु करण्यात येईल त्याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे.