भय इथले संपत नाही! सर्जरी केल्यावरही Black Fungus चा पुन्हा धोका; डॉक्टरही झाले हैराण, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:55 PM2021-07-02T16:55:26+5:302021-07-02T17:04:23+5:30

Black Fungus : रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे.

देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र असं असताना Black Fungus चा धोका वाढला आहे.

देशात ब्लॅक फंगसचे तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत.

'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत.

"म्युकोरमायकोसिस" असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत

देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे. यामुळे डॉक्टरही हैराण झाले असून वेळीच सावध असं सांगण्यात येत आहे. सर्जरीनंतरही ब्लॅक फंगस वेगाने पसरत आहे.

एसएमएस मेडिकल कॉलेजच्या म्युकोरमायकोसिस बोर्डच्या रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, एसएमएस रुग्णालयात आतापर्यंत 27 रुग्ण आढळून आलेत ज्यांना सर्जरीनंतर पुन्हा ब्लॅक फंगसची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 450 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 410 जणांवर सर्जरी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 25 रुग्ण असे होते. ज्यांच्या मेंदूपर्यंत ब्लॅक फंगस पोहोचला होता.

ब्लॅक फंगसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. य़ावर असणारं मुख्य औषध एम्फोटेरिसिनची कमतरता असल्याने चिंता वाढली असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.

कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या ही 40,845 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत 3129 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ब्लॅक फंगसच्या रुग्णांपैकी 34940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

52.69 टक्के लोकांना स्टेरॉईडमुळे हे इन्फेक्शन झालं आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील 32 टक्के रुग्णांना, 45 ते 60 वर्षांवरील 17464 तर 60 वर्षांवरील 24 टक्के रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे.

देशातील अनेक राज्यात ब्लॅक फंगसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना या सातत्याने करण्यात येत आहेत.