सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 14:01 IST2026-05-03T13:30:57+5:302026-05-03T14:01:48+5:30
Nita Ambani Shirdi Sai Baba Temple Visit: नीता अंबानी पारंपरिक पोशाखात मंदिरात आल्या आणि साईचरणी नतमस्तक झाल्या.

Nita Ambani Shirdi Sai Baba Temple Visit:
शिर्डीतील साईबाबा मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. हा परिसर भक्तांनी कायमच भरलेला असतो. साईचरणी लीन होऊन भक्तांना वेगळेच आत्मिक समाधान लाभते.

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनीही नुकतेच शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिरात होणाऱ्या विधींमध्ये सहभाग नोंदवला.

नीता अंबानी या पारंपरिक वेषात श्री साईबाबा समाधी मंदिरात आल्या होत्या. त्यांनी मनोभावे पूजा-अर्चना केली आणि साईंच्या चरणी लीन होत त्यांचा आशीर्वाद घेतला.

साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नीता अंबानी यांचे स्वागत केले आणि त्यांना श्री साईबाबांची मूर्ती देऊन सन्मानित केले.

नीता अंबानी अनेकदा धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. त्यांच्या शिर्डी भेटीतही साईबाबांप्रती असलेली त्यांची प्रगाढ श्रद्धा दिसून आली. (सर्व फोटो सौजन्य- श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी)

















