Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:04 IST2026-05-02T14:56:59+5:302026-05-02T15:04:04+5:30
Kotkapura Scooty Accident Video: पंजाबच्या कोटकपूरात स्कूटीस्वार महिलेचा भीषण अपघात! ओव्हरटेक करताना सीवरेजच्या झाकणाला धडकून महिला रस्त्यावर फेकली गेली. पहा डॅशकॅममध्ये कैद झालेला हा थरारक व्हिडिओ आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न.

Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली...
पंजाबच्या फरिदकोट जिल्ह्यातील कोटकपूरा परिसरातून रस्ते अपघाताचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. वेगात असलेली स्कूटी रस्त्यावरील सीवरेजच्या (गटाराच्या) वर आलेल्या झाकणाला धडकल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. ही संपूर्ण घटना मागून येणाऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाली असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या अॅक्टिव्हा स्कूटीवरून वेगाने जात होती. समोर असलेल्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना, रस्त्याच्या मधोमध असलेले सीवरेजचे झाकण उंच असल्याने स्कूटीचा टायर त्यावर आदळला आणि उडाला. यामुळे भर वेगात स्कुटरचे नियंत्रण गेले आणि ती महिला देखील सीटवरून टुणकण उडाली. स्कूटर हातात आणि महिलेचे दोन्ही पाय एका बाजुने रस्त्यावर अशी तिची परिस्थिती होऊन गेली. काही सेकंदातच नियंत्रण सुटले आणि महिला जोरात सिमेंटच्या रस्त्यावर आदळली, तर तिची स्कूटी काही अंतरापर्यंत फरफटत पुढे गेली.
आसपासच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. आधीच पडल्याने तिला फारसे लागले नाही. थोडेफार खरचटले यामुळे ती वाचली. स्कूटर पुढे रस्त्याशेजारच्या बंद दुकानांच्या शेडवर जाऊन आदळली.
प्रशासनाच्या दिरंगाईवर संताप
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावरील उघडी किंवा वर आलेली मॅनहोलची झाकणी दुचाकीस्वारांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत आहेत. सोशल मीडियावर अनेक युझर्सनी खराब रस्ते पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी ओव्हरटेक करताना आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
📍Kot Kapura, Faridkot, Punjab
— Trending Topics with Faiz (@newswithaftab14) May 1, 2026
Overtake + speed breaker = crash 😳
Scooty chalati mahila ne high speed me car overtake karne ki koshish ki…
Speed breaker par control gaya, skid hui aur gir gayi.
Road par hurry se zyada safety zaroori nahi?#RoadSafety#Punjab#Accident#Indiapic.twitter.com/HYjGf7weon