"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:29 IST2026-05-02T13:58:22+5:302026-05-02T14:29:10+5:30
"प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. २०२९ ला भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकतात, यात गैर काहीच नाही, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
"प्रत्येक पक्ष हा आपआपल्या पद्धतीने तयारी करत असतो, भाजपा स्वबळावर लढणार का? लढू शकते, शिवसेना स्वबळावर लढणार का? तर लढू शकते. यात गैर काहीच नाही. एका जागेसाठी युती तुटताना आम्ही पाहिली आहे, म्हणूनच प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो," असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले. 'सामना' दैनिकातून करण्यात आलेल्या काही दाव्यांना उत्तर देताना ते बोलत होते.
राजकारणात कधी बॉन्ड नसतो. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे ) गटावर टीका केली. ते म्हणाले, "उद्या जर 'उबाठा'ला असे वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना सोबत राहणार आहे आणि पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करतील, तर ते केवळ स्वप्नात वावरत आहेत. स्वप्न पाहण्यापेक्षा त्यांनी वास्तविकतेला समोर गेले पाहिजे. आम्ही येणारे कोणतेही संकट किंवा आव्हान स्विकारण्याची ताकद शिवसेनेत आहे, असेही शिरसाट म्हणाले.
दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होत नाही, असे सांगताना शिरसाट पुढे म्हणाले, "आम्ही कोण काय करतंय यापेक्षा आमचा पक्ष कसा पुढे नेता येईल, याचीच चिंता करत असतो. स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी कोणालाही कोणीही थांबवलेले नाही., असेही शिरसाट म्हणाले.
बच्चू कडू यांनी विचारपूर्वक शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत शिरसाट म्हणाले, "कडू यांना आगामी राजकारणाची दिशा माहित आहे. त्यांनी आधी काँग्रेससोबत केलेला घरोबा ही काय आत्महत्या नव्हती का? त्यांनी काँग्रेससोबत केवळ संगत केली नव्हती तर 'शय्या' केली होती., असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.