पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:41 IST2026-05-02T12:37:54+5:302026-05-02T12:41:23+5:30

May 2026 Rain India: मे महिन्यात पावसाचा इशारा! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ३ मे पासून दिल्ली, पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांत पावसाची शक्यता. अल-निनोचा मान्सूनवर काय परिणाम होणार? वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज.

May 2026 Rain India: Winds will start blowing from Pakistan to India; Weather will change in North India including Maharashtra | पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार

पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार

नवी दिल्ली: यावर्षी मे महिन्याची सुरुवात कडाक्याच्या उन्हाने नाही, तर विजांच्या कडकडाटासह आणि पावसाने होणार आहे. कालपासून राज्यातील हवामान थंड होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, २ मे च्या संध्याकाळपासून एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत असून, त्याचा मोठा परिणाम ३ मे पासून देशातील अनेक राज्यांवर दिसून येईल.

देशभरात पावसाचा इशारा (३ ते १० मे)
हवामान खात्यानुसार, पाकिस्तान आणि पश्चिम हिमालयाकडून येणाऱ्या या हवामान प्रणालीमुळे पुढील १० दिवस भारताच्या निम्म्याहून अधिक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी असेल.

उत्तर भारत: ३ आणि ४ मे रोजी पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास) पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३ ते ७ मे दरम्यान गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य भारत: पश्चिम मध्य प्रदेशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही काही भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

दक्षिण भारत: दक्षिण भारतातही लवकरच पावसाचा जोर वाढणार असून मान्सूनपूर्व हालचालींना वेग येणार आहे.

अल-निनो आणि मान्सूनचे गणित
मे महिन्याच्या पहिल्या १० दिवसात पावसामुळे उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार असला, तरी मे अखेरीस तापमानात मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सध्या प्रशांत महासागरात 'नॉर्मल' असलेली स्थिती हळूहळू 'अल-निनो' कडे सरकत आहे. मान्सूनच्या काळात अल-निनो पूर्णपणे विकसित झाल्यास पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्याचा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे.

Web Title : पाकिस्तान से हवाएँ भारत में लाएंगी बारिश, बदलेगा उत्तरी भारत का मौसम

Web Summary : पाकिस्तान की हवाओं से 3-10 मई तक उत्तर और मध्य भारत में मानसून पूर्व बारिश होगी। उत्तरी क्षेत्रों में ओलावृष्टि की आशंका है। मई की शुरुआत में गर्मी से राहत मिलेगी, लेकिन अल नीनो मानसून को प्रभावित कर सकता है।

Web Title : Pakistan Winds to Bring Rain, Change Weather in North India

Web Summary : Pakistan winds will bring pre-monsoon showers across North and Central India from May 3-10. Hailstorms are expected in northern regions. While early May offers heat relief, a developing El Nino could impact monsoon season.