सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 2, 2026 13:16 IST2026-05-02T13:16:06+5:302026-05-02T13:16:29+5:30

कौटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांची हत्या केल्याची घटना सोलापुरात घडली आहे.

Triple Murder in Solapu Man Kills Sister in Law and Two Nephews Over Land Dispute | सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या

सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या

सोलापूर : सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर असलेल्या बोरामणी गावात कौटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा खुन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत महिला व दिराचे शेतीच्या वादातून सतत भांडण होत होते. मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद विकोपाला गेला होता, त्यामुळे मारहाण व शिवीगाळीसारखे प्रकार सातत्याने होत होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास दिराने रागाच्या भरात भावजय व दोन पुतण्यांचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे हे घटनास्थळी दाखल झाले असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.

Web Title : सोलापुर: ज़मीन विवाद में तिहरा हत्याकांड; चाचा ने चाची, भतीजों की हत्या की

Web Summary : सोलापुर के बोरामणी में ज़मीन के विवाद में एक भयानक तिहरा हत्याकांड हुआ। ज़मीन को लेकर बढ़ते विवाद के बाद एक चाचा ने अपनी भाभी और उसके दो बेटों की हत्या कर दी। पुलिस जांच कर रही है; घटनास्थल पर भारी भीड़ जमा हो गई है।

Web Title : Solapur: Triple Murder Over Land Dispute; Uncle Kills Aunt, Nephews

Web Summary : In Boramani, Solapur, a land dispute led to a horrific triple murder. An uncle killed his sister-in-law and her two sons following escalating arguments over farmland. Police are investigating; a large crowd has gathered at the scene.