"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:08 IST2026-05-02T14:07:24+5:302026-05-02T14:08:34+5:30

जबलपूरच्या बरगी डॅममध्ये झालेल्या क्रूझ दुर्घटनेत दिल्लीच्या मरीना मेसी आणि त्यांचा ४ वर्षांचा मुलगा त्रिशान यांचा मृत्यू झाला.

"King, wake up...", the father's voice near the body of Trishan, who was lying on his mother's lap; Hearing this, your heart will cry! | "राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 

"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 

"राजा बेटा उठ ना, बघ बाबा आलेत... असा गप्प का बसलायस?" हे शब्द होते त्या दुर्दैवी पित्याचे, ज्याचे हसतेखेळते कुटुंब निसर्गाच्या कोपाने आणि यंत्रणेच्या बेजबाबदारपणाने एका क्षणात उद्ध्वस्त झाले. जबलपूरच्या बरगी डॅममध्ये झालेल्या क्रूझ दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. मात्र, दिल्लीच्या मेसी कुटुंबाची जी कहाणी समोर आली आहे, ती ऐकून कठोर काळजाच्या माणसाच्या डोळ्यांतही पाणी येईल.

मृत्यूच्या जबड्यात 'ममतेचे कवच'

गुरुवारची ती संध्याकाळ दिल्लीहून फिरण्यासाठी आलेल्या प्रदीप मेसी यांच्या कुटुंबासाठी मृत्यूचा पाश घेऊन येईल, असे कोणालाही वाटले नव्हते. क्रूझवर पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक वादळ उठले आणि १० फूट उंच लाटांनी क्रूझला कवेत घेतले. अवघ्या काही सेकंदात क्रूझ उलटली. चोहोबाजूला अंधार आणि किंकाळ्या होत्या. अशा परिस्थितीत ४ वर्षांच्या त्रिशानची आई मरीना मेसी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या पोटच्या गोळ्याला छातीशी घट्ट जकडले.

१४ तासांनंतरही आईची पकड ढिली झाली नाही

अपघातानंतर सुमारे १४ तासांनी जेव्हा लष्कराच्या बचाव पथकाने पाण्याखाली शोधकार्य सुरू केले, तेव्हा जे दृश्य दिसले ते पाहून त्यांचाही थरकाप उडाला. त्यांना मरीना यांचा मृतदेह सापडला, पण त्या एकट्या नव्हत्या. त्यांनी त्रिशानला आपल्या बाहूंमध्ये अशा प्रकारे लॉक केले होते की, जणू त्या अजूनही त्याला लाटांपासून वाचवत होत्या. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आईची ती पकड ढिली झाली नव्हती. बचाव पथकाला या दोघांचे मृतदेह वेगळे करताना मोठी कसरत करावी लागली.

"राजा बेटा उठ ना..." पित्याचा काळजाला भिडणारा टाहो

शनिवारी सकाळी पोस्टमार्टम झाल्यानंतर जेव्हा मरीना आणि त्रिशानचे पार्थिव प्रदीप मेसी यांच्या ताब्यात देण्यात आले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. आपल्या चिमुकल्याचा थंड पडलेला हात हातात धरून प्रदीप वारंवार त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते. "बाळा उठ, बघ तुझे बाबा आलेत, काहीतरी बोल राजा..." असे म्हणत त्यांनी फोडलेला हंबरडा उपस्थित सगळ्यांचेच काळीज चिरून टाकणारा होता.

यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा बळी?

प्रवाशांच्या आरोपानुसार, क्रूझवरील लाइफ जॅकेट केवळ शोभेच्या वस्तू होत्या, संकटसमयी त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. हवामान खात्याने इशारा दिलेला असतानाही क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन क्रूझ का चालवण्यात आली? या एका चुकीमुळे मेसी कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावला गेला आहे. प्रदीप मेसी आता आपल्या मुलीसह दिल्लीला परतणार आहेत, पण मरीना आणि त्रिशानच्या कधीही न पुसल्या जाणाऱ्या जखमा त्यांच्या सोबतीला असतील.

Web Title : बेटे के शव के पास पिता का क्रंदन: क्रूज दुर्घटना में हृदयविदारक त्रासदी।

Web Summary : जबलपुर में एक क्रूज दुर्घटना में दिल्ली के एक परिवार की जान चली गई। मरीना मेस्सी ने अपनी अंतिम सांस तक अपने बेटे त्रिशान की रक्षा की। शोक संतप्त पिता के शब्द गहरे दुख के साथ गूंजते हैं।

Web Title : Father's cry near son's body: Heartbreaking tragedy in cruise accident.

Web Summary : A cruise accident in Jabalpur claimed a Delhi family's lives. Marina Meсси protected her son, Trishan, until her last breath. The grieving father's words resonate with profound sorrow.