वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  

IPL 2026, RR VS DC: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर दिल्लीचा गोलंदाज कायल जेमिसन यांने जोरदार आणि आक्रमक अविर्भावात सेलिब्रेशन केलं होतं. मात्र या कृतीमुळे आता जेमिसन अडचणीत सापडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 13:02 IST2026-05-02T12:55:10+5:302026-05-02T13:02:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026, RR VS DC: Celebration after dismissing Vaibhav Suryavanshi, Jamieson got into trouble, BCCI gave him this punishment | वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  

वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  

आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सवर आरामात विजय मिळवला. दरम्यान, या लढतीत वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल हे राजस्थानचे विस्फोटक सलामीवीर झटपट बाद झाले होते. त्यापैकी वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर दिल्लीचा गोलंदाज कायल जेमिसन यांने जोरदार आणि आक्रमक अविर्भावात सेलिब्रेशन केलं होतं. मात्र या कृतीमुळे आता जेमिसन अडचणीत सापडला असून, बीसीसीआयने त्याता सक्त ताकिद देत त्याच्यावर कारवाई केली आहे.

या लढतीत राजस्थानच्या डावाला सुरुवात झाल्यावर काइल जेमिसनने विस्फोटक अंदाजात खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशील केवळ १४ धावांवर त्रिफळाचीत केलं होतं. त्यानंतर जेमिसनने वैभवसमोर जात आक्रमकपणे सेलीब्रेशन केलं होतं. जेमिसनची ही कृती वैभवला भडकवणारी होती. दरम्यान, जेमिनसने केलेल्या या कृतीची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आहे. तसेच जेमिसनने केलेल्या या कृत्यामुळे आयपीएलमधील कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.५ चं उल्लंघन झालं असल्याचा ठपका ठेवत सामनाधिकाऱ्यांनी त्याला एक डिमेरिट पॉईंट दिला आहे. तसेच त्याला असे कृत्य न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.  

काय आहे नियम
आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमधील कलम २.५ हे मैदानावर वादविवाद होऊ शकतात अशी भाषा आणि कृती करण्यावर मर्यादा आणते. दरम्यान, जेमिसनच्या या कृतीमुळे या नियमाचा भंग झाल्याचे सांगत सामनाधिकारी राजीव सेठी यांनी त्याला शिक्षा सुनावली आहे. जेमिसननेही आपली चूक मान्य केली असून, दिलेल्या शिक्षेचा स्वीकार केला आहे. 

सामन्याचा निकाल काय लागला?
दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत राजस्थानने रियान पराग आणि फरेराच्या आक्रमक खेळाच्या जोरावर २० षटकांमध्ये २२५ धावा फटकावल्या होत्या. मात्र लोकेश राहुल आणि पथुम निसंका यांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य सहज गाठले.  
 

Web Title : विकेट लेने के बाद जेमिसन का जश्न पड़ा महंगा: बीसीसीआई की कार्रवाई

Web Summary : वैभव सूर्यवंशी को आउट करने के बाद काइल जेमिसन का आक्रामक जश्न बीसीसीआई की कार्रवाई का कारण बना। दिल्ली कैपिटल्स-राजस्थान रॉयल्स मैच के दौरान आईपीएल की आचार संहिता का उल्लंघन करने पर उन्हें एक डिमेरिट पॉइंट मिला। जेमिसन ने मैच रेफरी के फैसले के बाद जुर्माना स्वीकार कर लिया।

Web Title : Jamieson's Celebration After Wicket Lands Him in Trouble: BCCI Action

Web Summary : Kyle Jamieson's aggressive celebration after dismissing Vaibhav Sooryavanshi led to BCCI action. He received a demerit point for violating IPL's code of conduct during the Delhi Capitals-Rajasthan Royals match. Jamieson accepted the penalty after the match referee's ruling.