थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 13:34 IST2026-05-03T13:34:07+5:302026-05-03T13:34:49+5:30

एका कार चालकाने दुचाकीला धडक दिल्यानंतर पित्याला २ किमी बोनटवर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Thrill! The child was thrown and the father was carried 2 km on the bonnet; The 'hit and run' in Hyderabad shook the country! | थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!

थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!

हैदराबादमधील मीरपेट परिसरात संतापजनक घटना समोर आली आहे. एका कार चालकाने दुचाकीला धडक दिल्यानंतर वाद झाला असता, चक्क पित्यालाच कारच्या बोनटवर लटकवून दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रस्त्यावरील वादातून माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा प्रत्यय देणारी एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कार चालकाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. या घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली असून, पित्याचा जीव थोडक्यात वाचला आहे.

नेमकी घटना काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, एसके जिलानी हे आपल्या मुलासह दुचाकीवरून जात असताना एका भरधाव कारने त्यांना मागून जोरात धडक दिली. या धडकेत फैसल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जिलानी आणि कार चालक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. कार चालकाला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी जिलानी कारच्या समोर उभे राहिले, पण निर्दयी चालकाने गाडी न थांबवता वेग वाढवला.

चालकाने गाडी वेगाने पळवल्याने जिलानी कारच्या बोनटवर पडले. मात्र, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी जिलानी यांना बोनटवर तशाच अवस्थेत लटकवून तब्बल २ किलोमीटरपर्यंत गाडी चालवली. हा थरार बालापूर चौरास्ता ते मंडमल्लम्मा चौरास्ता दरम्यान सुरू होता. रस्त्यावरील नागरिक हे दृश्य पाहून अवाक झाले होते. शेवटी, काही धाडसी स्थानिकांनी आणि इतर वाहनचालकांनी पाठलाग करून कार अडवली आणि जिलानी यांची सुटका केली.

चालक फरार, सीसीटीव्ही तपास सुरू

लोकांनी गाडी अडवताच संधी साधून आरोपी चालक कार सोडून घटनास्थळावरून पसार झाला. जिलानी यांचा मुलगा फैसल याला गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मीरपेट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title : हैदराबाद में दहशत: कार बोनट पर 2 किमी तक घसीटा!

Web Summary : हैदराबाद में एक कार चालक ने स्कूटर को टक्कर मारी, बच्चे को घायल कर दिया और बहस के बाद पिता को बोनट पर दो किलोमीटर तक घसीटा। स्थानीय लोगों ने हस्तक्षेप किया; चालक फरार हो गया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Horror in Hyderabad: Man dragged on car bonnet for 2 km!

Web Summary : In Hyderabad, a car driver hit a scooter, injured a child, and dragged the father on the bonnet for two kilometers after an argument. Locals intervened; the driver fled. Police are investigating.