'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 14:17 IST2026-05-03T14:14:58+5:302026-05-03T14:17:48+5:30

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. पण, एक महिलेने तिच्या मृत्यूपत्रात वेगळीच शेवटची इच्छा लिहून ठेवली. ती पूर्ण करणे कठीण होते, तरीही बहिणीने ती पूर्ण केलीच.

Don't burn me or bury me; Sister's last wish fulfilled; Wind chime made from sister's bones | 'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम

AI Generated Image

घराच्या बाल्कनीमध्ये मधुर आवाज निर्माण करणारे विंड चाइम, पण हे विंड चाइम कशाचे तर एका मेलेल्या व्यक्तीच्या हांडापासून बनवलेले. हे ऐकून तुम्हाला थोडं धक्काच बसला असेल, पण ज्या व्यक्तीच्या हाडांपासून हे बनले गेले, ती महिला होती आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठीच हे तिच्या बहिणीने बनवले. 

ही घटना आहे अमेरिकेतील एक राज्य असलेल्या कॉलोराडोच्या राजधानीतील. डेन्व्हर असे या शहराचे नाव आहे. माणसाच्या हाडांपासून बनवलेल्या या विंड चाइमचा आवाज कुणालाही घाबरवणाराच असेल. पण ४३ वर्षीय एरिन मेरेली यांच्यासाठी तो भीतीदायक नाही. कारण ज्या मानवी हांडापासून विंड चाइम बनवण्यात आले आहे, ती त्यांच्या बहिणीचीच आहेत. 

बहिणीची इच्छा एरिनने पूर्ण केली

एरिन मेरेली यांच्या बहिणीचे निधन झाले. तिने मृत्यूपत्रात माझा मृतदेह जाळण्यात येऊ नये किंवा जमिनीमध्ये दफन करू नये अशी इच्छा व्यक्त केलेली होती. मला एक निळ्या रंगाची विंड चाइम बनवा, असेही तिने म्हटलेले होते. 

बहिणीची शेवटची इच्छा एरिनने पूर्ण केली. त्यासाठी मदत घेतली गेली ती अल्कलाइन हायड्रोलिसिस तंत्रज्ञानाची. याला पाण्यातील अंत्यसंस्कारही म्हणतात. या पद्धतीमध्ये शरीराला रसायने मिसळवलेल्या पाण्यात ठेवले जाते. त्यामुळे मांस पूर्णपणे विरगळून द्रव बनते आणि हाडं तशीच राहतात. 

पाणी फुलांना टाकले आणि हाडांचे विंड चाइम बनवले

एरिनने बहिणीच्या मृतदेहाच्या मांसाचे जे पाणी तयार झाले होते, ते वेगवेगळ्या फुलांच्या झाडांना टाकले. आपली बहीण झाडांच्या माध्यमांतून जिवंत राहील, अशी तिची समजूत आहे. तर हाडांची भूकटी करण्यात आली.

गिलरन या कलाकाराच्या मदतीने हाडांच्या राखेला विशिष्ट साच्यात टाकण्यात आले. त्यात थोडा निळा रंगही टाकण्यात आला आणि त्याच पद्धतीने विंड चाइम बनवण्यात आले, जशी एरिनच्या बहिणीची होती.

Web Title : बहन ने पूरी की अंतिम इच्छा: हड्डियों से बनाया विंड चाइम।

Web Summary : कोलोराडो में एक महिला ने अपनी बहन की असामान्य अंतिम इच्छा को पूरा करते हुए उसकी हड्डियों से विंड चाइम बनाया। बहन ने न तो दाह संस्कार और न ही दफनाने का अनुरोध किया था, बल्कि एक अनोखा स्मारक चुना। क्षारीय जल अपघटन का उपयोग शरीर को संसाधित करने के लिए किया गया था, और हड्डियों से नीले रंग का विंड चाइम बनाया गया, जो एक भयावह रूप से सुंदर श्रद्धांजलि है।

Web Title : Sister fulfills dying wish: Wind chimes made from human bones.

Web Summary : A woman in Colorado honored her sister's unusual death wish by creating wind chimes from her bones. The sister requested neither cremation nor burial, opting for a unique memorial. Alkaline hydrolysis was used to process the body, and the bones were crafted into a blue-tinged wind chime, offering a hauntingly beautiful tribute.