ऐकावे ते नवलंच! एकिकडे डॉक्टर करत होते सर्जरी; अन् रुग्ण महिला चक्क वडे तळत बसली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:14 PM2020-06-11T14:14:19+5:302020-06-11T14:24:38+5:30

ऑपरेशनच्यावेळी लोक बेशुद्धावस्थेच असातात. पण एक महिला स्वतःच्या डोक्याचीच सर्जरी सुरू असताना वडे तळत आहे. ही घटना वाचून तुम्हाला तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. ही महिला आपली सर्जरी सुरू असताना पारंपारिक इटॅलियन ऑलिव वडे तळत आहे. अडीच तास सुरू असलेल्या या ऑपरेशनदरम्यान या महिलेने ९० वडे तळले आहेत. इटलीमध्ये या वड्यांना एपरीटिफ्स (Aperitifs) असं म्हणतात.

इटलीतील एंकोनामध्ये ६० वर्षांच्या महिलेला डोक्याचा आजार झाला होता. त्यामुळे ही महिला आजारी होती. डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागणार असं सांगितले. पण महिलेला ऑपरेशनदरम्यान जागं राहावं लागणार अशी अट ठेवण्यात आली. मग त्या महिनेले विचार केला की, या वेळेत मी माझी कामं पूर्ण करू शकते.

अजींडा ओसपेडाली रियूनिटी हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटचे डॉं. रॉबर्टो ट्रिगनानी यांनी हे ऑपरेशन केले. त्यांनी महिलेला सांगितले की, जोपर्यंत ऑपरेशन सुरू आहे. तोपर्यंत तुम्हला झोपता येणार नाही. महिलेले अडिच तास सुरू असलेल्या या ऑपरेशनदरम्यान ९० वडे तळले आहे. डॉक्टरांची टीम रुग्ण महिला काय करत आहे. याकडे बारकाईने लक्ष देऊन होती.

सर्जरी करत असताना या महिलेला जागं राहण्यास सांगितले होते. कारण अशा ऑपरेशनमध्ये रुग्णाला पॅरालिसिस अटॅक येण्याची शक्यता असते. जागं राहिल्यामुळे रुग्णाला पॅरालिसिसचा अटॅक येण्याचा धोका कमी होतो.

ऑपरेशन थिएटरमधील महिला रुग्णांच्या बेडवर एक टेबल ठेवण्यात आला होता. तसंच वडे तळण्यासाठी लागणारं सामान सुद्धा आणून दिलं होतं. मग सर्जरी सुरू असतानाच या महिलेने वडे तळले.

याआधीसुद्धा लंडनच्या किंग्स कॉलेज हॉस्पीटलमध्ये ५३ वर्षीय डॅगमार टर्नर ही महिलासुद्धा आपल्या डोक्याची सर्जरी सुरू असताना वायलिन वाजवत होती.

सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, रुग्ण आपलं काम करत असताना सुद्धा सर्जरी दरम्यान कोणतीही अडचड निर्माण झाली नाही. इटलीतील माध्यमांनी संपूर्ण ऑपरेशनची माहिती सर्वत्र प्रकाशित केली आहे.