आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 10:22 AM2021-04-25T10:22:54+5:302021-04-25T10:28:10+5:30

Viral News : हुंड्यासाठी हे सगळं केलं असावं असा संशय अनेकांना आला म्हणून मुलीकडच्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं.

सोशल मीडियावर एका तरूणाच्या मारहाणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पण त्याला कारणही तसंच आहे. चार वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला होता. इतकंच नाही तर बोलणी पूर्ण होऊन साखरपुडाही पार पडला. त्यानंतर नवरदेवाने नवरीच्या डोळ्यात दोष असल्याचं कारण देत लग्न न करण्याची भाषा वापरू लागला.

संतापलेल्या वधूपक्षाने नवरदेवाला बंद खोलीत चांगलाच चोप दिला. खापरखेडाच्या नवऱ्या मुलासह त्यांच्या नातेवाईकांचाही ‘पाहुणचार’ घेण्यात आला. ही घटना आकोल्याची असून गेल्या दोन दिवसांपासून घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चार वेळा पाहूनही करुन पाहुणचाराचा मोठा फटका आणि मनस्ताप मुलीच्या कुटुंबाला दिल्यावर पाचव्यांदा मुलीत दोष दाखवणाऱ्या नवऱ्या मुलाला कपडे घेण्याच्या बहाण्याने बोलावून वधूपक्षाने बंद खोलीत चांगलंच मारलं.

चार वेळा मुलगी बघायचा कार्यक्रम झाला आणि साखरपुडा आणि शिदोरी झाली, तेव्हा काय या लोकांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या होत्या काय? असा प्रश्न विचारण्यात आला. हुंड्यासाठी हे सगळं केलं असावं असा संशय अनेकांना आला म्हणून मुलीकडच्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं.

तेथिल उपस्थित एका व्यक्तीनं हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. मध्यस्थामार्फत पुन्हा पाहणी आणि कपडे घेण्यासाठी मुलाला बोलावून घेण्यात आले. बंद खोलीत त्याची धुलाई करुन चांगलाच पाहुणचार करण्यात आला. नवरीकडील मुलांनी तुफान बदडल्यानंतर ५ लाख देत नाही, तोवर या तरूणाला कोंडून ठेवले. तेवढ्यात रात्री पैशाची व्यवस्था झाली आणि त्यांची सुटकाही झाली, मात्र व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.