'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
By कोमल खांबे | Updated: May 5, 2026 14:11 IST2026-05-05T14:01:06+5:302026-05-05T14:11:19+5:30
'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाचा सीक्वल येणार का? अशी विचारणा सगळीकडे होत आहे.

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक मराठी चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे.

'राजा शिवाजी' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने ४ दिवसांतच ३९ कोटींचा बिजनेस केला आहे.

रितेश देशमुखचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाचा सीक्वल येणार का? अशी विचारणा सगळीकडे होत आहे.

'राजा शिवाजी' सिनेमाच्या निमित्ताने रितेशने नागपूरमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्याने सिनेमाच्या सीक्वलबाबत भाष्य केलं.

रितेश म्हणाला, "सध्या या सिनेमाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजून खूप छान प्रतिसाद मिळाला तर ती नंतरची गोष्ट आहे".

"पण, सध्या तरी या सिनेमाचा हा एकच भाग आहे", असं म्हणत रितेशने स्पष्टीकरण दिलं आहे.

'राजा शिवाजी' सिनेमात अभिषेक बच्चन, जिनिलीया देशमुख, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

















