Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा, Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरी करा भीम जयंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:49 IST2026-04-13T17:27:04+5:302026-04-13T20:49:47+5:30

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes in Marathi: भीम जयंतीचा उत्साह आता सोशल मीडियावरही साजरा करा! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी खास डिझाइन केलेले शुभेच्छा संदेश आणि फोटोंची ही विशेष गॅलरी.

आजचा दिवस आहे गौरवाचा, उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा, ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा, देशाला दिला नव्या भविष्याचा आधार... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

बाबांच्या लेखणीने लिहिलं भविष्य आमचं, दिशा दिली अन्यायाविरोधात चालण्याची, वेळ बदलेल, काळही बदलेल पण जय भीमचा नारा कायम गगनात घुमेल... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची... भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला, नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सजली अवघी धरती पाहण्या तुमची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्यानं नसानसात भरली स्फूर्ती, आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची! भीम जयंतीच्या शुभेच्छा!

सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!