Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण; गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला, पाहा आजचे दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 02:23 PM2021-09-13T14:23:48+5:302021-09-13T14:27:10+5:30

Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून प्रतिकिलो चांदीचा दर 63,345 रुपये इतका आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 0.4 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 0.9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता.

सोमवारी बाजारपेठ उघडल्यानंतर मुंबईत सोन्याचा प्रतितोळा भाव 47070 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 50340 रुपये इतका आहे. चेन्नई आणि कोलकाता येथे प्रतितोळा सोन्याचा दर अनुक्रमे 48390 रुपये व 49140 रुपये इतका आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.