स्वप्नातील घर आता बजेटमध्ये! 'या' सरकारी बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त गृहकर्ज; पाहा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:10 IST2026-02-08T11:07:00+5:302026-02-08T11:10:38+5:30

Cheapest Home Loan : गृहकर्ज घेताना आजही मध्यमवर्गीय कुटुंबांचा सर्वाधिक ओढा सरकारी बँकांकडे असतो. पारदर्शकता, कमी चार्जेस आणि विश्वसनीय प्रणाली ही या बँकांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

सध्याच्या आकडेवारीनुसार, बँक ऑफ इंडिया ७.१०% या दराने सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही गृहकर्जाच्या शोधात असाल, तर ही बँक तुमच्यासाठी टॉपवर असू शकते.

स्वस्त कर्जाच्या शर्यतीत कॅनरा बँक ७.१५% आणि पंजाब नॅशनल बँक ७.२०% व्याजासह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया ७.२५% दराने कर्ज देत आहे. बँकांचे मोठे जाळे आणि सुरक्षा यामुळे अनेक ग्राहक थोडा दर जास्त असूनही एसबीआयलाच पसंती देतात. तर पंजाब अँड सिंध बँक ७.३०% व्याजदराने गृहकर्ज देत आहे.

सरकारी बँकांमधून कर्ज घेण्याचा मोठा फायदा म्हणजे 'हिडन चार्जेस' नसणे. येथे नियम स्पष्ट असतात आणि सणासुदीच्या काळात प्रोसेसिंग फीमध्येही सवलत मिळते.

बँकांनी जाहीर केलेले सर्वात कमी व्याजदर हे प्रामुख्याने ७५० किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांसाठी असतात. तुमचा सिबिल स्कोर कमी असल्यास बँक व्याजाचा दर वाढवू शकते.

जेव्हा रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करते, तेव्हा त्याचे फायदे खाजगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँका ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवतात, ज्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होऊ शकतो.