मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 07:56 IST2026-05-20T07:56:29+5:302026-05-20T07:56:49+5:30

NEET paper leak : विद्यार्थ्यांसाठी न्याय मागणारा मोटेगावकर आता पेपरफुटी प्रकरणात अटकेत

neet paper leak: Motegaonkar was fighting against the paper leak, now he himself has become an accused... | मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...

मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : २०२४ मध्ये नीट पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठविणारा आणि न्यायासाठी जनहित याचिका दाखल करणारा लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर आता २०२६ च्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात आरोपी ठरला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याला अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सीबीआयच्या तपासात मोटेगावकर याच्या मोबाइलमध्ये नीट-यूजी २०२६ची कथित फुटलेली प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २०२४ मधील त्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मोटेगावकर विद्यार्थ्यांसाठी न्यायाची मागणी करताना दिसतो. २०२४ मध्ये पेपरफुटीविरोधात आक्रमक भूमिका घेणारा मोटेगावकर आता स्वतःच २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणात आरोपी झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांसाठी लढणारा शिक्षक ते कथित पेपरफुटी रॅकेटमधील आरोपी असा झालेला हा प्रवास शिक्षण क्षेत्रासाठी धक्कादायक मानला जात आहे. 

व्हिडीओत काय म्हटले होते मोटेगावकरने? 
या  व्हिडीओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाला होता, “नीट २०२४ मध्ये मोठा घोटाळा झाला आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
आज आम्ही मुंबईत आलो आहोत. मुंबई उच्च न्यायालयात आवश्यक माहिती गोळा करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना भेटून हा विषय जनआंदोलन बनवण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत असल्याने सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे.”

Web Title : नीट पेपर लीक: वकील अब विरोध के बाद खुद आरोपी

Web Summary : नीट पेपर लीक के खिलाफ लड़ने वाले शिवराज मोटेगाँवकर अब 2026 के लीक में आरोपी हैं। सीबीआई ने लीक पेपर मिलने के बाद उन्हें गिरफ्तार किया। न्याय की मांग का उनका पुराना वीडियो फिर सामने आया, जिससे घोटाले में उनकी भूमिका पर सवाल उठे।

Web Title : NEET Paper Leak: Advocate Now Accused After Fighting Against It

Web Summary : Shivraj Motegaonkar, who fought against the NEET paper leak, is now accused in the 2026 leak. CBI arrested him after finding a leaked paper. His old video demanding justice resurfaced, raising questions about his involvement in the scandal.