मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 09:13 IST2026-05-20T09:04:09+5:302026-05-20T09:13:37+5:30

मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना २६ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरु आहे.

Death was not due to watermelon but...; Police get shocking information in the death case of 4 people | मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती

मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती

काही दिवसापूर्वी मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हा मृत्यू कलिंगड खाल्ल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता, आता या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...

मिळालेल्या माहितीनुसार, घरातून जप्त करण्यात आलेले मिठाचे नमुने देखील एफएसएल चाचणीसाठी पाठवण्यात आले. झिंक फॉस्फाइड मिश्रित मीठ कलिंगडावर लावण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. घरात कुठेही झिंक फॉस्फाइड न सापडल्याने झिंक फॉस्फाइडच्या स्रोताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. चौघांचाही मृत्यू झिंक फॉस्फाइडनेच झाल्याचा सर जेजे रुग्णालयाच्या अहवालात समोर आले आहे.

डोकाडिया कुटुंबातील चौघांच्याही शरीरातून तसेच कलिंगडावर देखील झिंक फॉस्फाइड आढळले होते. त्यामुळे कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे.

शरीरात झिंक फॉस्फाइड आढळले

डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचा हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल समोर आला होता. त्या चार जणांच्या शरीरात झिंक फॉस्फाइड आढळळ्याच्या फॉरेन्सिक अहवालाला हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातून दुजोरा दिला आहे.  मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून आल्याचे हिस्टोपॅथॉलॉजी अहवालात स्पष्ट झाले आहे. मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून येण हा झिंक फॉस्फाइड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत असल्याचे अहवालात म्हटले आहे. आता पोलिसांनी घरातून जप्त करण्यात आलेले मिठाचे नमुने एफएसएल चाचणीसाठी पाठवले आहेत. 

पायधूनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणी डोकाडीया कुटुंबीयांच्या शरीरातून तसेच जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यात झिंग फॉस्फाईड सापडले आहे. मृत्यूचे कारण हे विषारी रसायन असले तरी त्याला डॉक्टरांच्या पुष्टीची आवश्यकता आहे.

Web Title : मुंबई परिवार की मौतें: तरबूज नहीं, जिंक फास्फाइड जहर का संदेह

Web Summary : मुंबई में परिवार की मौत, पहले तरबूज से होने का दावा, अब जिंक फास्फाइड जहर की ओर इशारा। नमक के नमूने परीक्षण के लिए भेजे गए। शवों और तरबूज में जहर के निशान मिले, जिससे जानबूझकर दूषित होने का संकेत मिला। जिंक फास्फाइड का स्रोत ढूंढने के लिए जांच जारी है।

Web Title : Mumbai Family Deaths: Not Watermelon, but Zinc Phosphide Poisoning Suspected

Web Summary : Mumbai family's death initially blamed on watermelon now points to zinc phosphide poisoning. Salt samples were sent for testing. Traces of the poison were found in bodies and watermelon, indicating deliberate contamination. Investigation continues to find the source of zinc phosphide.