दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 12:07 IST2026-05-20T12:04:40+5:302026-05-20T12:07:55+5:30

अकोला येथून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका दुचाकीला धडक दिल्यानंतर, लक्झरी बसने पेट घेतला आणि बघता बघता ...

Luxury bus catches fire after hitting a bike, incident on Balapur Shegaon road | दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना

दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना

अकोला येथून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका दुचाकीला धडक दिल्यानंतर, लक्झरी बसने पेट घेतला आणि बघता बघता संपूरअण बस खाक झाली. जिल्ह्यातील बाळापूर-शेगाव मार्गावर बुधवारी (२० मे रोजी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित खासगी लक्झरी बस पुण्यावरून अकोल्याकडे जात होती. दरम्यान, बाळापूर पासून साधारणपणे चार किलोमीटर अंतरावर ही बस   एका दुचाकीला धडकली. यामुळे बसच्या इंजिनमध्ये स्पार्कीग झाले आणि बसने पेट घेतला. यानंतर, बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली.

सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र, दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

Web Title : बालापुर-शेगांव मार्ग पर टक्कर के बाद लग्जरी बस में लगी आग

Web Summary : बालापुर-शेगांव मार्ग पर एक मोटरसाइकिल से टकराने के बाद एक लग्जरी बस में आग लग गई। पुणे से अकोला जा रही बस के इंजन में चिंगारी उठी और देखते ही देखते बस आग की लपटों में घिर गई। कोई भी हताहत नहीं हुआ, लेकिन मोटरसाइकिल सवार को मामूली चोटें आई हैं और उसका इलाज चल रहा है।

Web Title : Luxury Bus Catches Fire After Collision on Balapur-Shegaon Road

Web Summary : A luxury bus caught fire on the Balapur-Shegaon road after colliding with a motorcycle. The bus, en route from Pune to Akola, sparked in the engine, quickly engulfing the vehicle. No fatalities were reported, but the motorcyclist sustained minor injuries and is receiving treatment.