Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 12:20 IST2026-05-20T12:19:35+5:302026-05-20T12:20:42+5:30

Xi Jinping Statement on Iran War: इराण-अमेरिका युद्धाच्या झळ अनेक देशांच्या अर्थव्यवस्था बसत आहेत. हे युद्ध दीर्घकाळ चालल्यास प्रचंड मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असताना आता चीनने तोडगा सुचवला आहे.

Jinping on Iran War: China's initiative to stop the Iran war, Xi Jinping gave a four-point proposal | Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव

Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव

Xi Jinping on US Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौरा करून मायदेशात परतले असतानाच चीनने इराण-अमेरिका युद्धाबद्दल तोडगा सूचवला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती निर्णायक वळणावर पोहोचली आहे. आता ती युद्धाकडून शांतता प्रस्थापित करण्याकडे दिशेने जात आहे, असे शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. 

चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे की, हा युद्ध संघर्ष थांबवणे खूप जास्त गरजेचे बनले आहे. आता पुन्हा युद्ध सुरू करण्याला अजिबात समर्थन दिले जाऊ शकत नाही. 

शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग म्हणाले, "मध्य पूर्व मध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी माझा चार सूत्रांचा प्रस्ताव आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाठिंबा मिळेल आणि तणाव कमी होईल. संघर्ष कमी होईल आणि शांतता वाढीस लागेल."

शी जिनपिंग यांचा हा चार मुद्द्यांचा प्रस्ताव मागील महिन्यात अबू धाबीच्या राजासोबत झालेल्या बैठकीत समोर आला होता.  या प्रस्तावात शांततापूर्ण सह-अस्तित्व, राष्ट्रीय सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर आणि विकास व सुरक्षा यांच्यातील समन्वित दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे.

 

Web Title : ईरान युद्ध रोकने के लिए चीन की पहल; शी जिनपिंग का चार सूत्रीय प्रस्ताव।

Web Summary : चीन के राष्ट्रपति शी जिनपिंग ने ईरान और अमेरिका के बीच तनाव कम करने और मध्य पूर्व में शांति को बढ़ावा देने के लिए एक चार सूत्रीय योजना का प्रस्ताव रखा है। प्रस्ताव में शांतिपूर्ण सह-अस्तित्व, राष्ट्रीय संप्रभुता, अंतर्राष्ट्रीय कानून और सुरक्षा के साथ समन्वित विकास पर जोर दिया गया है, जिसका उद्देश्य आगे के संघर्ष को रोकना है।

Web Title : China proposes to stop Iran war; Xi Jinping's four-point plan.

Web Summary : China's President Xi Jinping proposes a four-point plan to de-escalate tensions between Iran and the US and foster peace in the Middle East. The proposal emphasizes peaceful co-existence, national sovereignty, international law, and coordinated development with security, aiming to prevent further conflict.