शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:57 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...  

28 Apr, 26 12:10 PM

इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर

सोमवारी रात्री वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे पुण्याजवळ रूळावरून घसरले. यामुळे सोलापुरातून सुटणारी इंटरसिटी, सिद्धेश्वर एक्स्प्रेससह इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. सकाळी ६.३० वाजता सुटून १०.३० वाजता पुण्यात पोहोचणारी इंटरसिटी सध्या पोफळज रेल्वे स्थानकावर आहे. तर रात्री मुंबईतून निघालेली सिद्धेश्वर एक्स्प्रेस दुपारी दोन वाजता सोलापुरात पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. वाचा सविस्तर

28 Apr, 26 12:07 PM

अनिल देशमुख आक्रमक

राज्यातील शेतकरी सध्या अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडला आहे. सोयाबीनला भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाला असतानाच, आता खतांच्या किमतीत २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भरमसाठ वाढ करून सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी खत दरवाढ, ऑटो चालकांना मराठी सक्ती आणि बच्चू कडू यांच्या पक्ष विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. वाचा सविस्तर

28 Apr, 26 12:06 PM

सोन्या-चांदीच्या दरात घसरण

 मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर सुरुवातीला सोन्यात किरकोळ तेजी दिसली होती, मात्र त्यानंतर दरात घसरण झाली. आज सोन्याची किंमत १,५१,५९५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४०,९१२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

28 Apr, 26 12:05 PM

अल्ट्राटेक सिमेंट एका शेअरवर देणार २४० रुपयांचा डिविडेंड

देशातील आघाडीची सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंटनं आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, सरलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा २० टक्क्यांनी वाढून ३,०००.०२ कोटी रुपये झाला. या शानदार निकालांनंतर कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर २४० रुपयांच्या भरघोस लाभांशाची घोषणा केली आहे.

28 Apr, 26 11:57 AM

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर १४५ कोटींचे वाटप- रोहित पवार

रोहित पवार यांनी सीआयडी कार्यालयाला भेट दिल्यानंतर गंभीर आरोप केले. अनेक शेतकरी कंत्राटदार हे त्यांच्या पैशांसाठी आंदोलन करत आहेत. पण व्हीएसआरला जानेवारी महिन्यापासून म्हणजेच अजित पवारांचा अपघात झालेल्या २८ तारखेपासून आतापर्यंत १४५ कोटी रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये देण्यात आले आहेत. २७ जानेवारी रोजी पंधरा कोटी दिले आहेत. अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी या वि. के. सिंगला कदाचित बक्षीस म्हणून नऊ कोटी ८१ लाख देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी रुपये दिले," असं रोहित पवार म्हणाले.

28 Apr, 26 11:23 AM

खरातने पीडितेला दिली मुलांना ठार मारण्याची धमकी

भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातने स्वत: कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून, मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीला पाण्यामध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास दैवी शक्तीने तिच्या मुलांना ठार मारण्याची व तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली, अशा स्वरूपाचा गंभीर आरोप या गुन्ह्याप्रकरणी खरातवर आहे. वाचा सविस्तर

28 Apr, 26 11:22 AM

​खत दरवाढीवरून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; कारखानदारांवर कारवाई करा, अनिल देशमुखांची आक्रमक मागणी

राज्यातील शेतकरी सध्या अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडला आहे. सोयाबीनला भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाला असतानाच, आता खतांच्या किमतीत २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भरमसाठ वाढ करून सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे," अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खत दरवाढ, ऑटो चालकांना मराठी सक्ती आणि बच्चू कडू यांच्या पक्ष विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.

28 Apr, 26 11:10 AM

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर विमानतळावर दाखल

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज बार्शी, सोलापूर दौऱ्यावर; सोलापुरात दुपारी होणार विजयी संकल्प मेळावा

28 Apr, 26 10:49 AM

TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा

टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. अटकपूर्व व अंतरिम जामीन अर्जावरील निकालासाठी २ मे ही तारीख निश्चित केली असून, तोपर्यंत निदा खानच्या अटकेवर टांगती तलवार आहे. या गंभीर गुन्ह्यात मलेशियाशी संबंधित काही आर्थिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचा धक्कादायक खुलासा सरकारी वकील अजय मिसर यांनी केला, जे जबाव या प्रकरणात प्राप्त झाले आहेत, त्यात धर्मांतराचा प्रयत्न करण्यासाठी मालेगाव कनेक्शनही आहे, ते कनेक्शन मिसर यांनी न्यायालयासमोर नमूद केले. वाचा सविस्तर

28 Apr, 26 10:47 AM

दाऊद टोळीला मोठा झटका! 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू आणि कुख्यात ड्रग्ज तस्करसलीम डोला याला अखेर तुर्कस्तानमधून भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी एका विशेष विमानाने त्याला दिल्लीच्या टेक्निकल विमानतळावर आणले. इस्तंबूलमध्ये तुर्की सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या अटकेनंतर, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे त्याचे प्रत्यार्पण शक्य झाले आहे. (सविस्तर वाचा)

28 Apr, 26 10:44 AM

महापारेषणचे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड! नागपूरकरांना बसला फटका

नागपूर: शहरात वाढत्या उष्णतेसोबतच विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. याचाच फटका मंगळवारी नागपूरकरांना बसला. १३२ केव्ही मानकापूर उपकेंद्रातील महापारेषणच्या (MSETCL) रोहित्रावर (Transformer) अचानक अतिरिक्त भार आल्याने दीक्षाभूमी उपकेंद्राशी संबंधित अनेक भागांचा वीजपुरवठा दुपारी विस्कळीत झाला होता. मात्र, महावितरणच्या तातडीच्या 'बॅकफीड' नियोजनामुळे मोठा अनर्थ टळला.

28 Apr, 26 10:43 AM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंचपदासाठीच्या पोटनिवडणुकच्या मतदानाला सुरुवात

संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंचपदासाठीच्या पोटनिवडणुकीत आज मतदान होत आहे.  

28 Apr, 26 10:43 AM

बुधवार पेठेतील डिस्को-मॅचबॉक्स बिल्डिंगवर छापे; १५ बांगलादेशींसह १८ जण ताब्यात

पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डिस्को आणि मॅचबॉक्स (माचीस) बिल्डिंगमध्ये टाकलेल्या छाप्यात एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात १५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

28 Apr, 26 10:30 AM

मराठी भाषा अनिवार्य करणारच, पण...

राज्यात १ मे २०२६ म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टँक्सी चालकांना मराठी भाषा  अनिवार्य करण्याचा निर्णय लागू होणार होता. मात्र मराठी शिकण्यासाठी तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी संघटनांनी केली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवारी परिवहन भवनमध्ये ५९ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (आरटीओ) बैठक होणार आहे. या बैठकीत सक्ती कधीपासून लागू करायची याचा निर्णय होईल. त्यामुळे १ मेपासून हा निर्णय लागू करण्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरElectionनिवडणूक 2026Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIPL 2026आयपीएल २०२६