शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई

By संतोष कनमुसे | Updated: April 28, 2026 10:42 IST

दाऊद इब्राहिमला मोठा झटका बसला आहे. त्याच्या जवळचा कुख्यात ड्रग माफिया सलीम डोला याला तुर्की येथून प्रत्यार्पित करण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याने त्याला अटक केली असून, सध्या दिल्लीत त्याची चौकशी सुरू आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू आणि कुख्यात ड्रग्ज तस्करसलीम डोला याला अखेर तुर्कस्तानमधून भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी एका विशेष विमानाने त्याला दिल्लीच्या टेक्निकल विमानतळावर आणले. इस्तंबूलमध्ये तुर्की सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या अटकेनंतर, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे त्याचे प्रत्यार्पण शक्य झाले आहे.

IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी

सलीम डोला हा फक्त दाऊदचा साथीदारच नाही, तर जागतिक सिंथेटिक ड्रग नेटवर्कमधील एक मुख्य चेहरा आहे. तो दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतात अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे मोठे सिंडिकेट चालवत होता. या अवैध व्यापाराची वार्षिक उलाढाल ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतीय तरुणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने देशाच्या विविध भागांत प्रयोगशाळा आणि कारखाने उभारले होते.

  • यंत्रणांचे यश - भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने ही गुप्त मोहीम राबवली.

  • चौकशीचा घेरा- सध्या दिल्लीत डोलाची सखोल चौकशी सुरू असून, त्यानंतर त्याला मुंबई पोलीस किंवा NCB च्या ताब्यात दिले जाईल.

  • कुटुंबावर आधीच कारवाई: ऑक्टोबर २०२५ मध्ये त्याचा सहकारी सोहेल शेख, तर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याचा मुलगा ताहिर डोला आणि कुटुंबातील ४ सदस्यांना दुबईतून भारतात आणून अटक करण्यात आली होती.

  • बक्षीस आणि नोटीस: डोलाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय 'रेड कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली होती आणि एनसीबीने त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.५,००० कोटी रुपयांचे अमली पदार्थांचे साम्राज्य

    डोलाचे संबंध थेट दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी जोडलेले आहेत. तो भारतात अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे एक मोठे जाळे चालवत होता. जागतिक सिंथेटिक ड्रग नेटवर्कमध्ये सलीम डोलाचे नाव प्रमुख मानले जाते. त्याचे ड्रग सिंडिकेट दरवर्षी ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा अवैध व्यापार करत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dawood's aide Salim Dola arrested in Turkey, brought to India.

Web Summary : Dawood Ibrahim's close aide, drug smuggler Salim Dola, was extradited from Turkey to India. He ran a ₹5,000 crore drug syndicate, now under investigation.
टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमPoliceपोलिस