आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम आजही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर आहे. आयपीएल २०२७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या ४९ धावांवर ऑलआउट झाला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळण्यात आला. अवघ्या १३२ धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ ९.४ ऑलआउट झाला. या सामन्यात आरसीबीच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. तर, कोलकात्याकडून नॅथन कोल्टर-नाईल, ख्रिस वोक्स आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
आयपीएल २००९ मध्ये आरसीबीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा संघ १५.१ षटकांतच अवघ्या ५८ धावांवर ऑलआउट झाला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेत, त्या हंगामाच्या सुरुवातीच्याच आठवड्यात खेळला गेला होता. या सामन्यात अनिल कुंबळे यांनी अवघ्या ५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीविरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला. जयपूरमध्ये १७२ धावांचा पाठलाग करताना त्यांनी पॉवरप्लेच्या आतच पाच विकेट्स गमावले. त्यानंतर राजस्थानच्या संघाने पाठोपाठ विकेट्स गमावले आणि त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या ५९ धावांवर ऑलआउट झाला.
आयपीएल २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ अघ्या ६६ धावांवर ऑलआउट झाला होता. मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २१२ धावांचे डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मुंबईकडून हरभजन सिंह आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएलमधील 'लो-स्कोअरिंग' सामन्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पुन्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ आहे. आयपीएल २०१७ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना दिल्लीचा संघ अवघ्या ६७ धावांवर ऑलआउट झाला होता. या सामन्यात पंजाबकडून संदीप शर्माने २० धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि दिल्लीच्या फलंदाजीच्या वरच्या फळीला खिंडार पाडले. हा सामना पंजाबने ८ विकेट्स राखून जिंकला होता.