छत्रपती संभाजीनगर: अजिंठा लेणीत ई-वाहने ठरली कुचकामी, डिझेल बसचा धोका कायम
अजिंठा लेण्यांतील ई-वाहने नापास ठरल्याने डिझेल बस सुरू, चित्रांना धोका. प्रदूषणामुळे चिंता वाढली आहे. लवकरच नवीन इलेक्ट्रिक बस सुरू होणार, प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न. अजिंठा लेण्यांत लवकरच २२ आसनी ई-बस येतील. टप्प्याटप्प्यांत एकूण २० ई-वाहने येतील. कमीत कमी वेळेत पर्यटकांची चढ-उतार होईल, अशी या ई-वाहनांची रचना असेल.
छत्रपती संभाजीनगर: पीएच.डी. चा व्हायवा रखडला: संशोधनानंतरही विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरूच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी. रखडल्या. सादर केलेले प्रबंध पडून, कागदपत्रे हरवतात, तोंडी परीक्षा पुढे ढकलल्या जातात. लोक प्रशासन व इतर विभागात शैक्षणिक प्रगतीला खीळ बसल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत.
छत्रपती संभाजीनगर: कौटुंबिक इतिहास नाही, तरीही कर्करोग? तज्ञांचा आरोग्यदायी जीवनशैलीचा सल्ला
कुटुंबात कर्करोगाचा इतिहास नसतानाही कर्करोग होतो, जीवनशैली, प्रदूषण, आहार हे मुख्य घटक आहेत. लवकर निदान आणि निरोगी जीवनशैली प्रतिबंध व उपचारांसाठी आवश्यक आहे. कर्करोगाला घाबरू नका; वेळेवर तपासणी करा.
पुणे: पार्थ पवारांच्या अमोडिया एंटरप्रायजेसचा आणखी 1 गैरव्यवहार; शासनाची फसवणूक
बोपोडी येथील एकूण पाच हेक्टर ३५ आर ही जमीन १८८३ पासून कृषी विभागाकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात, तसेच वहिवाटीत आहे. या जमिनीचे मालक आणि ताबेदार हे कृषि विभागाचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले होते. या जमिनीचा अपहार करुन या जमिनीवर व्हिजन प्रॉपर्टीतर्फे अर्जदार हेमंत गवंडे, त्यांचे वतीने राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस तसेच विद्यानंद पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शितल तेजवाणी, दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्याशी संगनमत करुन सरकारी मिळकतीवर त्यांचा मालकी हक्क दिसून येत आहे, असा बेकायदा आदेश आणि पत्र तयार करुन शासनाची फसवणूक केली आहे.
हिंगोली: सरकारने विश्वासघात केला, बंड करा! ठाकरेंचे शेतकऱ्यांना सरकार उलथवण्याचे आवाहन.
उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांची कर्जमाफीत फसवणूक केल्याचा आरोप केला. अपूर्ण आश्वासने आणि कथित निवडणूक फसवणूक यामुळे 'विश्वासघातकी सरकार' उलथून पाडण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले, तसेच संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली.
राष्ट्रीय: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा घणाघात
ज्यांनी जमीन चोरली आहे, ते मते चोरूनच सत्तेत आले आहेत. मोदीजी गप्प आहेत आणि त्यांचे मौन बरंच काही सांगून जात आहे. कारण लुटारूंच्या पाठिंब्यावरच त्यांचं सरकार टिकलेले आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महायुती सरकार आणि पंतप्रधानांवर टीकास्त्र डागले. पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणावरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
बीड: माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
मनोज जरांगे-पाटील यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपांना उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंचे आरोप फेटाळले आणि नार्कोटेस्टची मागणी केली.
राष्ट्रीय: ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काल(दि.7) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. रीगा येथे झालेल्या सभेत भाषण करताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे.
बीड: 'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच अन्...'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर मुंडेंचा संताप
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा थेट आरोप कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. "कट प्रकरणी बोलणारे, अटक झालेले आणि कबुली देणारे सर्वजण जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत," असा दावा करत मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जालना: मनोज जरांगे हत्या कट: दोघांवर गुन्हा, जुना सहकारी संशयित
मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात दोघांना अटक; जुना सहकारी संशयित. अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचा आरोप. जरांगेंनी थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत चौकशीची मागणी केली. या कटामागील मुख्य सूत्रधार आणि राजकीय संबंधांचा तपास पोलीस कसून करत आहेत.
नांदेड: शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात उद्धव ठाकरेंचे 'वोटबंदी'चे आवाहन!
शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या खोट्या आश्वासनांवरून सरकारवर 'वोटबंदी'चे आवाहन केले. त्यांनी मदतीच्या वितरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व एकजूट होण्याचे आवाहन केले.
व्यापार: लिस्टिंगपूर्वी लेन्सकार्ट GMP आपटला; IPO चे 'बुरे दिन'?
लेन्सकार्टचा आयपीओ पुढील आठवड्यात लिस्ट होणार आहे. जेव्हा या आयपीओचा प्राईस बँड घोषित झाला, तेव्हाच त्याने ग्रे मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवली होती. पण आता या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम धडाम झाला आहे, यात मोठी घसरण झाली आहे.
राष्ट्रीय: 'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघाताची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणी करत विमानाचे दिवंगत पायलट सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगर: सिल्लोडमध्ये भेसळयुक्त खत कारखाना उघडकीस; शेतकऱ्यांशी गद्दारी, मोठे नुकसान.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये बनावट खत कारखाना उघडकीस आला. कृषी विभागाला सदर गोडाऊनमध्ये बनावट खते पॅकिंग होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. अधिकाऱ्यांनी १९ लाख रुपयांचे बनावट खते जप्त केली. हे रॅकेट किती मोठे आहे, याचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय: 'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', खरगेंचा भापप-RSS वर गंभीर आरोप
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) आणि भारतीय जनता पक्षावर तीव्र टीका केली आहे. 'संघाने राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात ब्रिटिश सरकारचा साथ दिला आणि देशाच्या संविधानाचा अपमान केला,' असा आरोप खरगेंनी केला आहे.
महाराष्ट्र: अजित पवारांचा यू-टर्न; पार्थच्या जमीन व्यवहाराबद्दल कल्पना नसल्याचा दावा
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराबद्दल कल्पना नसल्याचा दावा अजित पवारांचा अजित पवार यांनी केला. यापूर्वी माहिती असल्याचं विधान केले होते. कमी मूल्यांकनाच्या मालमत्तेच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू असून विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत.
पुणे: कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार
मुंढवा येथील जमीन प्रकरणाचा संपूर्ण खरेदी-विक्रीचा व्यवहार दिग्विजय पाटील यांच्या नावाने झाला असून, पार्थ पवार यांचे ते नातेवाईक आणि भागीदार आहेत. दिग्विजय पाटील हे अजित पवार यांचे मेव्हणे अमरसिंह पाटील यांचे पुत्र आणि सुनेत्रा पवार यांचे पुतणे आहेत एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार कंपनीचे भागीदार या नात्याने या जमिनीचा व्यवहार करावा आणि योग्य त्या ठिकाणी कागदपत्रांवर सह्या कराव्यात, असे पार्थ पवार यांनी त्यात स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय: रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
देशभरात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी (7 नोव्हेंबर 2025) सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात तीन महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार, राज्य सरकारांनी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण (Vaccination) आणि नसबंदी (Sterilization) करुन त्यांना शेल्टर होममध्ये ठेवावे, तसेच हा आदेश आठ आठवड्यांच्या आत अमलात आणावा, असे निर्देश दिले गेले आहेत.
जालना: जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हत्येच्या कटाचा आरोप; अडीच कोटींची सुपारी!
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अडीच कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. मुंडेंनी मारेकऱ्यांशी भेटी घडवून आणल्या, असा दावा आहे. जरांगे यांनी मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहन केले आहे.
फिल्मी: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजय दत्त, साकारणार 'ही' खास भूमिका
बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त आता मराठी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटामध्ये खास भूमिका साकारणार आहे. 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तच्या एन्ट्रीमुळे चाहते खूश झाले आहेत. ऐतिहासिक भूमिकेत संजय दत्तला पाहणे प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
फिल्मी: कतरिना कैफ आणि विकी कौशल झाले आईबाबा! घरी चिमुकल्याचं आगमन
कतरिना कैफ आणि विकी कौशल आईबाबा झाले आहेत. कतरिनाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. ७ नोव्हेंबर रोजी विकी कौशल आणि कतरिनाच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. कतरिना आणि विकीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग, अफगाणिस्तानवर हल्ला; तालिबानचा इशारा
पाकिस्तानने ड्युरंड सीमारेषेवर गोळीबार केल्याने अफगाणिस्तानात संताप उसळला आहे. अफगाणिस्तान आणि तालिबानने जोरदार प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. या हल्ल्यात पाच नागरिक मारले गेले. पाकिस्तान टीटीपी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप आहे. शांतता प्रयत्नांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.
पुणे: ‘एचएसआरपी’विना धावणाऱ्या वाहनांना ३० नोव्हेंबरनंतर एक हजार दंड ?
वाहनधारकांच्या दुर्लक्षामुळे एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याचा वेग मंदावला असून, ३० नोव्हेंबरनंतर एचएसआरपीविना धावणाऱ्या वाहनांवर १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आला होता
राष्ट्रीय: कोकणात ठाकरे, शिंदे गट एकत्र येणार? भाजपाला आव्हान देणार
कोकणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कणकवलीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येऊन भाजपाला आव्हान देण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली असून वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पुणे: मुंढवा जमीन प्रकरणात दुय्यम निबंधकांचे निलंबन;पाच जणांची समिती करणार तपास
पुणे : मुंढवा येथील तीनशे कोटी रुपयांच्या किमतीच्या ४० एकर जमीन नोंदणी प्रकरणात सहा कोटी रुपयांचा सेस (जमीन मूल्याच्या दोन टक्के) न घेतल्याबद्दल दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे राज्य सरकारने निलंबन केले आहे. तसेच तारू यांच्यावर दस्तासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत हलगर्जीपणा दाखविल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
शिक्षण: राणेंच्या कॉलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी ९ लाखांची मागणी; चौकशीचे आदेश
एसएसपीएम मेडिकल कॉलेजने एमबीबीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ९.२० लाख रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पैसे नसल्याने प्रवेश रद्द करण्यास भाग पाडले असाही विद्यार्थ्याने आरोप केला आहे. सीईटीने या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कॉलेजने आरोप नाकारले आहेत.
रायगड: नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा सुरू; प्रवाशी आनंदले; वेळापत्रक जाहीर
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू झाली. मालवाहू गाडीच्या चाचणीनंतर उत्साहात सेवा सुरू झाली. वेळापत्रकानुसार नेरळ ते माथेरान आणि परत अशा दोन फेऱ्या होणार आहेत. माथेरान ते अमन लॉज दरम्यान शटल सेवा सुरू राहणार आहे.
मुंबई: मुंबई मेट्रो भाडेवाढ होण्याची शक्यता, समितीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला!
अंधेरी-दहिसर मेट्रोच्या दरात वाढ संभवते. खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याने भाडे निर्धारण समितीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. मुंबईतील इतर मेट्रोचे दर अधिक आहेत. त्यामुळे आर्थिक गणित जुळवून आणण्यासाठी मेट्रोत भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे. समिती याबाबतचा निर्णय घेईल.
मुंबई: अभियंत्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन: निष्पाप प्रवाशांचा बळी, जनक्षोभ उसळला
दोषी अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी CSMT स्थानकावर आंदोलन केले. लोकल थांबवल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तशातच रुळ ओलांडताना दोन ठार, तर अनेक जण जखमी झाले. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याचा आरोपही होत असून कारवाईची मागणी केली जात आहे.
पुणे: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने बाजारभावापेक्षा कितीतरी पट कमी किंमतीत ४० एकर भूखंड खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये पार्थ पवारांचे नाव नाही. पोलिसांनी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.