Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:01 IST

Gold-Silver Rate Today 28 April: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold-Silver Rate Today 28 April: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर सुरुवातीला सोन्यात किरकोळ तेजी दिसली होती, मात्र त्यानंतर दरात घसरण झाली. आज सोन्याची किंमत १,५१,५९५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४०,९१२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

दरांमध्ये झालेला बदल

सोमवारी एमसीएक्सवर सोन्याची किंमत १,५१,७४७ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,४२,२०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोनं १५२ रुपयांनी तर चांदी १,२८५ रुपयांनी खाली आली आहे. 'इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'च्या आकडेवारीनुसार, काल २४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,१९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,४७,५६० रुपये प्रति १० ग्रॅम होता.

घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात

सकाळच्या तेजीनंतर घसरण का झाली?

आज जागतिक कमोडिटी बाजार 'कॉमेक्स' (COMEX) वर बाजार उघडल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत होती. इराणनं युद्ध समाप्तीसाठी दिलेल्या प्रस्तावावर अमेरिका सकारात्मक भूमिका घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या प्रस्तावावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून कमोडिटी बाजार पुन्हा एकदा दबावाचा सामना करत आहे.

काय आहेत नवे दर?

शहर२४ कॅरेट२२ कॅरेट१८ कॅरेट
दिल्ली₹1,53,150₹1,40,400₹1,14,900
मुंबई₹1,53,000₹1,40,250₹1,14,750
कोलकाता₹1,53,000₹1,40,250₹1,14,750
चेन्नई₹1,53,820₹1,41,000₹1,17,600
बंगळुरू₹1,53,000₹1,40,250₹1,40,250

तज्ज्ञांचं मत

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांच्या मते, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे बाजार सध्या सावध पवित्रा घेत आहे. अमेरिका आणि इराणमधील संबंधांबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. सोमवारी सोन्याचा व्यापार स्थिर राहिला आणि किमती गेल्या सत्राच्या मर्यादेतच राहिल्या. दुसरीकडे गुंतवणूकदारांना आता फेडरल रिझर्व्ह बँकेच्या आजपासून सुरू होणाऱ्या बैठकीतील निर्णयांची प्रतीक्षा आहे. हे निर्णय २९ एप्रिल रोजी जाहीर होतील, त्यानंतर बाजारामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold-Silver Prices Fluctuate: Check Today's Rates in Your City

Web Summary : Gold and silver prices declined on MCX. Uncertainty in US-Iran relations and rising crude oil prices impacted the market. Check latest rates for 24K, 22K, and 18K gold in Delhi, Mumbai, Kolkata, Chennai, and Bangalore.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक