नवी दिल्ली - मोबाइल डेटाचा वापर आणि वेग प्रचंड वाढला असला, तरी आजही अनेक लोकांच्या घरी किंवा इमारतींच्या आत गेल्यानंतर नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कंबर कसली आहे. नव्या नियमांनुसार, आता इमारतींच्या बांधकाम आराखड्यातच ‘डिजिटल पायाभूत सुविधां’चा समावेश अनिवार्य असणार आहे. ‘ट्राय’चे अध्यक्ष ए. के. लाहोटी यांनी ही माहिती दिली.
घर खरेदी करताना कळणार नेटवर्क आहे की नाही
सध्या एआयचा वापर वाढत असल्याने केवळ मोबाइल नेटवर्कवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळेच नियामक आता ‘फिक्स्ड ब्रॉडबँड’ नेटवर्कच्या विस्ताराला अधिक प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून ग्राहकांना इमारतींच्या आतही अखंड सेवा मिळेल. जसे फ्रीज किंवा एसीला वीज बचतीनुसार रेटिंग दिले जाते, तसेच आता निवासी व व्यावसायिक इमारतींना तिथे मिळणाऱ्या डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या गुणवत्तेनुसार रेटिंग दिले जाईल. यामुळे घर खरेदी करताना तिथे नेटवर्क कसे आहे, हे समजेल.
नेटवर्कसाठी ६०० मेगाहर्ट्झ बँड ठरणार आता गेमचेंजर
घरांच्या भिंती भेदून सिग्नल आत पोहोचवण्यासाठी कमी वारंवारतेचे स्पेक्ट्रम आवश्यक असते. यासाठी ‘ट्राय’ने सरकारकडे ६०० मेगाहर्ट्झ आणि ३७ ते ४० गिगाहर्ट्झ बँड उपलब्ध करून देण्याची शिफारस केली आहे. ६०० मेगाहर्ट्झ बँडमुळे इमारतींच्या कोपऱ्यातही मोबाइल सिग्नल स्पष्ट मिळण्यास मदत होईल.
Web Summary : Facing home network issues? TRAI mandates digital infrastructure in building plans. Buildings will receive connectivity ratings, aiding buyers. 600 MHz band spectrum recommended for better indoor signals.
Web Summary : घर में नेटवर्क समस्या से परेशान? ट्राई ने बिल्डिंग प्लान में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर अनिवार्य किया। इमारतों को कनेक्टिविटी रेटिंग मिलेगी, जिससे खरीदारों को मदद मिलेगी। बेहतर इंडोर सिग्नल के लिए 600 मेगाहर्ट्ज बैंड स्पेक्ट्रम की सिफारिश की गई है।